चासकमान धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग; 550 क्युसेकने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात चासकमान धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग; 550 क्युसेकने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र

चासकमान धरणातून वाढवला पाण्याचा विसर्ग; 550 क्युसेकने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात

डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकवरून ५५० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Krupadan Awale

चाकण : खेड तालुक्यातील चासकमान धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवार (दि. २६) रोजी सकाळी १० वाजता डाव्या कालव्यातून ५०० क्युसेकवरून ५५० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

चासकमान धरणाच्या गुरुवार (दि. २६) रोजी सकाळी ६ वाजताच्या आकडेवारीनुसार धरणात एकूण २०६.४१ दशलक्ष घनमीटर (७.२९ टीएमसी) पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा १७९.२२ दशलक्ष घनमीटर (६.३२ टीएमसी) इतका आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ८३.५५ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात १०० टक्के म्हणजेच ७.५८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा धरण परिसरात आतापर्यंत एकूण १,०४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी दिवसभरातील पावसाची नोंद शून्य असून, धरणात नवीन पाण्याची आवकही झालेली नाही. १ जूनपासून आतापर्यंत धरणात एकूण ६२१.११ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

दरम्यान, सध्या धरणाच्या सांडव्याद्वारे विसर्ग सुरू नसून, डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी वाढविण्यात आलेल्या या विसर्गामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

धरणात नवीन पाण्याची आवकही

यंदा धरण परिसरात आतापर्यंत एकूण १ हजार ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, गुरुवारी दिवसभरात पावसाची नोंद झाली नाही. तसेच धरणात नवीन पाण्याची आवकही झालेली नाही. १ जूनपासून आतापर्यंत चासकमान धरणात एकूण ६२१.११ दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

रब्बी पिकांना त्याचा फायदा

रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाण्याची गरज वाढत असताना डाव्या कालव्याचा विसर्ग ५० क्युसेकने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांना वेळेत पाणी देता येणार असून, गहू, हरभरा, कांदा आणि इतर रब्बी पिकांना त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Fashion: परफ्यूम वापरताय? जाणून घ्या परफ्यूमचे विविध प्रकार आणि त्यांची खास वैशिष्ट्ये!

२६ नोव्हेंबर राशीभविष्य: आर्थिक लाभ, करिअर आणि प्रेमाच्या बाबतीत काय सांगतात ग्रह?

Revanath Maharaj: नवनाथांपैकी सातवे सिद्ध गुरू रेवणनाथ; जाणून घ्या जन्मकथा, गुरुभेट आणि संजीवन समाधीचे महत्त्व

Mandar Kiwale Assisination Case:दिसला की तोडला! सख्ख्या भावानेच रचला कट! मंदार किवळेच्या हल्ल्यामागचे खरे कारण समोर

Soup Recipe: लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात? मग थंडीच्या दिवसांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप