सिनेमा

सलमानकडून रितेशला बर्थ डे गिफ्ट! 'वेड' चित्रपटातील सलमान खान सोबतच्या नव्या गाण्याच टिझर प्रदर्शित

सलमान खान आणि रितेश देशमुख अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसणार आहेत. सलमानने खानने 'वेड लावलयं' गाण्याचं टिझर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.

Pooja Pawar

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) आज ४४ वा वाढदिवस आहे. रितेशवर त्याच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील कलाकारांकडून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच रितेश देशमुखला बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan)खास बर्थ डे गिफ्ट दिले. सलमान खानने 'वेड' (Ved) चित्रपटातील रितेश सोबतच्या नव्या गाण्याचा टिझर लाँच केला आहे. या गाण्यात सलमान खान आणि रितेश धम्माल डान्स करताना दिसत आहेत.

अभिनेता सलमान खान आणि रितेश देशमुख या दोघांमधील नातं फार जिव्हाळ्याचं आहे. दोघेही एकमेकांना 'भाऊ' म्हणून हाक मारतात. सलमान खानने या पूर्वी देखील रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट 'लय भारी' मधे पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' हा नवाकोरा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटातील 'बेसुरी' आणि 'वेड तुझा' ही दोन गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच चित्रपटातील 'वेड लावलयं' हे नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खान आणि रितेश देशमुख अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसणार आहेत. सलमानने खानने 'वेड लावलयं' गाण्याचं टिझर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी; दक्षिण कोरियामध्ये करणार प्रतिनिधित्व

Business News : फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल; CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; ११ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Dharashiv Water Storage : धाराशिवचा पाणीसाठा 5.14 टक्क्यांवर; आठ महिन्यांचे नियोजन करा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Khamgaon: कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात! CCI केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; खासगी व्यापाऱ्यांकडून ५० हजार क्विंटल खरेदी