Amir Khan (फोटो सौजन्य- Xअकाउंट)  
बॉलीवूड

लाल सिंग चड्ढाच्या फ्लॉपद्वारे आमिर खानने घेतला मोठा धडा, बनवली नवी रणनीती

बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. तथापि, यावेळी, अभिनेत्याचे चित्रपटामधील यश कमी होत असल्याचे दिसते कारण गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्याच्या एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. आता ५९ वर्षीय अभिनेत्याने चित्रपटांबाबत एक नवी रणनीती बनवली आहे.

सायली ससाणे

आमिर खानने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे आणि हिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. 'गजनी', 'थ्री इडियट्स', 'पीके', 'दंगल', 'लगान' आणि 'दिल चाहता है' हे त्यांचे सर्वोत्तम चित्रपट आहेत. मात्र, हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या पडद्यावरुन गायब होता. गेल्या 6 वर्षात त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. पण आता बातम्या येत आहेत की अभिनेता नवीन सुरुवात करण्याच्या रणनीतीवर काम करत आहे.

चित्रपटांमधून घेतली व्रिश्रांती

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आमिर खान एका वर्षात किमान एक चित्रपट करण्याचा विचार करत आहे. तसेच, आमिर खानने अलीकडेच चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता कारण त्याला वाटत होते की एक स्टार आणि अभिनेता म्हणून तो त्याचे काम त्याला हवे तसे करू शकत नाही.

आमिर खानचे आगामी चित्रपट

लवकरच अभिनेता त्याच्या आगामी 'सितारे जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे जो ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसूजाही असणार आहे. याशिवाय त्याचा 'हॅपी पटेल' हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये वीर दास, इम्रान खान आणि मोना सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

आमिर खानचे चित्रपट सतत फ्लॉप होत गेले

गेल्या काही काळापासून आमिर खानला बॉक्स ऑफिसवर यश मिळालेले नाही. त्याचा ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट खूप मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला होता पण प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. या चित्रपटात आमिर खानसोबत अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा सना शेख, मोहम्मद जीशान अयुब आणि रोनित रॉय दिसले होते.

यानंतर 2022 मध्ये लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी हिट झाली असली तरी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपयशी ठरला. त्यानंतर गेली दोन वर्षे त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

IND Vs NZ: ' तेथील खेळपट्टी कशी असेल...'; दुसऱ्या टेस्टआधी हेनरीने केले मोठे भाष्य

Thane District Sports Complex : ठाणे जिल्ह्यात विविध खेळांसाठी क्रीडा संकुले उभारणार; खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती

Aadhaar Mobile Number Update : आधार केंद्रावर जाण्याचे टेन्शन नाही! फक्त 75 रुपयांत घरबसल्या लिंक करा नवीन मोबाइल नंबर

‘शिक्षणाचे माहेरघर हे गुन्हेगारांचे आवडते घर झाले...’; रोहित पवारांचा घणाघात

Gold Silver Price Crash : नोव्हेंबरमध्ये सोने-चांदी कोसळले! किमती आणखी खाली येणार का?