(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम) 
बॉलीवूड

१३ व्या दिवशीही 'War 2' आणि 'Coolie'मध्ये जबरदस्त टक्कर, कमाईच्या शर्यतीत कोण आहे पुढे?

'वॉर २' आणि 'कुली' यांच्यात १३ व्या दिवशीही जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांने वर्चस्व अजूनही आहे. चला तर मग जाणून घेऊयात १३ व्या दिवसाचे कलेक्शन.

सायली ससाणे
  • १३ व्या दिवशीही 'War 2' आणि 'Coolie' चे कलेक्शन
  • कमाईच्या शर्यतीत कोणता चित्रपट पुढे?
  • चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन?

रजनीकांतचा 'कुली' आणि हृतिक रोशनचा 'वॉर २' बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देत आहेत. कमाईच्या बाबतीत दोघांचेही वर्चस्व आहे. आठवड्याच्या शेवटीच्या तुलनेत दोघांच्या कमाईत घट झाली असली तरी, या दोन्ही चित्रपटांचा या वर्षातील टॉप ५ चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हृतिक रोशन आणि रजनीकांतच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे जाणून घेऊयात.

'वॉर २' चे ऐकून कलेक्शन

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, 'वॉर २' ने भारतात १३ व्या दिवशी २.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्याची हिंदी ऑक्युपन्सी १४.७६% होती. चित्रपटाच्या शोबद्दल बोलायचे झाले तर, सकाळचे शो ७.७३%, दुपारचे शो १३.०९%, संध्याकाळचे शो १३.९३% आणि रात्रीचे शो २४.२७% होते. चित्रपटाने आतापर्यंत भारतात २२७.२५ कोटींची कमाई केली आहे.

'कुली' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

दुसरीकडे, रजनीकांतच्या 'कुली' ने १३ व्या दिवशी 'वॉर २' पेक्षा जास्त कमाई केली. रजनीकांतच्या ॲक्शन चित्रपटाने ३.२५ कोटींची कमाई केली. त्याची तमिळ ऑक्युपन्सी १५.१४% होती. सकाळचे शो १२.३९%, दुपारचे शो १३.७०%, संध्याकाळचे शो १५.११% आणि रात्रीचे शो १९.३६% होते. चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'कुली' ने भारतात २६३.८५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

वर्ल्डवाइड कलेक्शन

'कुली'ने वर्ल्डवाइड कलेक्शनमध्ये ४८३.५ कोटींची कमाई केली आहे. तर 'वॉर २' अजूनही रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे आहे. या चित्रपटाने ३४३.७५ कोटींचा व्यवसाय केला आहे. जो अजूनही 'कुली'पेक्षा १३९.७५ कोटींनी मागे आहे. कुलीच्या मागे असूनही, हृतिक रोशनचा हा चित्रपट या वर्षातील चौथा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. दुसरीकडे, 'कुली' 'सैयारा' आणि 'छावा'चा रेकॉर्डही मोडू शकलेला नाही आणि तो तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!