(फोटो सौजन्य - सोशल मीडिया) 
बॉलीवूड

शाहिद कपूरचा 'देवा' चित्रपट करू शकेल का धमाल? पाहिल्यादिवशी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई!

'देवा' ची ॲडव्हान्स विक्री काल म्हणजेच २९ जानेवारी रोजी सुरू झाली. या चित्रपटाची आतापर्यंत किती तिकिटे विकली गेली आहेत आणि त्यातून चित्रपटाने किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

सायली ससाणे

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' हा चित्रपट या शुक्रवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता एका अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. यामुळेच त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या तिकिटांचे ॲडव्हान्स बुकिंग प्रदर्शित होण्यापूर्वीच सुरू झाले आहे. तसेच हा चित्रपट पहिल्याच दिवशी चांगली कमाई करणार आहे. आपण आता जाणून घेणार आहोत की चित्रपट पहिल्याच दिवशी किती कमाई करतो.

आता ॲडव्हान्स बुकिंगमधून करणार एवढी कमाई

बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग पोर्टल सॅकॅनिल्कनुसार, बुधवारपर्यंत चित्रपटाची २६,२२० तिकिटे विकली गेली आहेत. ७,०७४ शोसाठी बुकिंग झाले आहे. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून एकूण ६४.०५ लाख रुपये कमावले आहेत, परंतु जर ब्लॉक सीट्सचाही समावेश केला तर हा आकडा १ कोटी २८ लाख रुपयांपर्यंत वाshahid kaढला आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हे आकडे अंतिम नाहीत रात्री उशिरापर्यंत यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

चांगल्या सुरुवात करेल चित्रपट?

या आकडेवारीवरून असा अंदाज लावला जात आहे की 'देवा' पहिल्या दिवशी सुमारे चार ते पाच कोटी रुपये कमवू शकेल. चित्रपटाचे बजेट सुमारे ८५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात करण्यासाठी, चित्रपटाला पहिल्या दिवशी त्याच्या खर्चाच्या किमान १० टक्के कमाई करेल. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हे स्टार्स देखील चित्रपटात आहेत

या चित्रपटात शाहिद कपूर एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर, पूजा हेगडे पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित या चित्रपटात पावेल गुलाटी देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

स्काय फोर्सला देणार टक्कर

या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. असे असूनही, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला इतर चित्रपटांचा सामना करावा लागणार आहे. खरंतर, अक्षय कुमार आणि वीर पाहरिया यांचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करत आहे. हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.

December Horoscope: डिसेंबरमध्ये या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, लक्ष्मी नारायण योगामुळे मिळणार आर्थिक लाभाच्या संधी

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या