(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)  
बॉलीवूड

Rajvir Jawanda Death: पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन, ११ दिवस व्हेंटिलेटरवर; हरला मृत्यूची झुंज

पंजाबी गायक राजवीर जावंदा याने जगाचा निरोप घेतला आहे. ११ दिवस व्हेंटिलेटरवर आयुष्याशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले. या दुःखद बातमीने पंजाबी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

सायली ससाणे
  • पंजाबी गायक राजवीर जवंदाचे निधन
  • ११ दिवस गायक होता व्हेंटिलेटरवर
  • वयाच्या ३५ वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंजाबी गायक राजवीर जावंदा यांचे निधन झाले आहे. गायक ११ दिवसांपासून मोहालीतील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. २७ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील बड्डीजवळ झालेल्या एका मोठ्या रस्ते अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. राजवीरचे वय ३५ वर्ष होते आणि त्यांच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

कसा झाला गायकाचा अपघात?

राजवीर जावंदा मोटारसायकलवरून शिमलाहून सोलनला जात असताना हा अपघात झाला. बड्डीजवळ त्याचा तोल गेला, ज्यामुळे त्याचा जीवघेणा अपघात झाला. गायकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचताच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही राजवीर ११ दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि आयुष्यासाठी झुंज देत होता.

सेलिब्रिटींनी त्याच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना

राजवीरच्या निधनाने पंजाबी संगीत इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतरही, दिलजीत दोसांझ, गिप्पी ग्रेवाल, अ‍ॅमी विर्क, नीरू बाजवा आणि कंवर ग्रेवाल यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट देखील शेअर केल्या. हाँगकाँगमधील त्याच्या संगीत कार्यक्रमादरम्यान, दिलजीत दोसांझने गर्दीला राजवीरसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले.

राजवीर जावंदा कोण?

राजवीर जावंदाने २०१४ मध्ये 'मुंडा लाईक मी' या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुढे गायकाने "खुश रे कर," "तू दिसा पैंदा," "सरनेम," "सरदारी," "आफरीन," "डाउन टू अर्थ," "लँडलॉर्ड," आणि "कंगनी" सारखी हिट गाणी देखील तयार केली. संगीत क्षेत्रासोबतच, राजवीर यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली. "जिंद जान" आणि "मिंडो तसलीदारणी" सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!

IPL 2027: लिलावात कोणता संघ लावणार Aaryavir Sehwag वर बोली? ३ संघ बनवू शकतात सेहवागच्या मुलाला करोडपती

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश; मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक

Jio Recharge Plan: 700 रुपयांहून कमी किंमत आणि भरपूर फायदे... जिओचा 'हा' प्लॅन पाहून यूजर्स चकित, इतकी आहे व्हॅलिडिटी

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!