(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम ) 
सिनेमा

Gautami Patil New Song: ‘सुंदरा’ व ‘कृष्ण मुरारी’ नंतर गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’ गाण्याला भरभरून प्रेम

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या 'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या गाण्याने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे.

अमृता यादव

'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या गाण्याने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला आहे. अर्थातच हे धुमाकूळ घालणारं गाणं नृत्यांगना गौतमी पाटीलच आहे. 'सोनचाफा' हे गाणं सध्या तुफान गाजतंय. गौतमीच्या मोहक अदा आणि नृत्याने या गाण्याला विशेष वजन आलं. नवरात्रोत्सवात तर या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं. आणि गौतमीही यंदाच्या नवरात्रीत या गाण्यावर थिरकत साऱ्यांच मन जिंकताना दिसली. यानंतरही हे गाणं साऱ्यांना थिरकायला भाग पाडतंय. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या डान्ससह तिचा लूकही बराच व्हायरल झाला.

गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यावर गौतमी बरेचदा इव्हेंटमध्ये थिरकतानाही दिसली. यावेळी तिचा लूकही अनेकांच्या पसंतीस पडला. याचे अनेक रील व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. 'साईरत्न एंटरटेनमेंट' या प्रॉडक्शन हाऊसच्या या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिलेली पाहायला मिळत आहे. हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. 'साईरत्न एंटरटेनमेंट'साठी गौतमी पाटीलने 'सुंदरा' आणि 'कृष्ण मुरारी' ही दोन गाणी केली आहेत. या तिच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि आता सोनचाफालाही भरपूर प्रेम दिलं.

संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. सध्या गौतमीच 'सोनचाफा' हे गाणं साऱ्यांच्या पसंतीस पडत असून यावर अनेकजण थिरकताना दिसत आहेत.

गौतमी पाटील हिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका अपघाताप्रकरणी पोलिसांनी तिला नोटीस बजावली आहे. वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला एका वाहनाने धडक दिली होती. ते वाहन गौतीमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात एका भरधाव वाहनाने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!