Summer Vacation movie : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय करायचं याचं प्लानिंगचं नाही तर प्रत्यक्ष ते अंमलात आणायलाही तुम्ही कधीच सुरुवात केली असेल. मात्र, या सुट्ट्यांमध्ये सिल्व्हर स्क्रीनवर कोणते सिनेमा झळकणार? कोणता सिनेमा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही पाहू शकता हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नुकतीच IMDB ने भारतातील बहुप्रतीक्षित सिनेमांची यादी घोषित केली आहे.
पठानला मिळालेल्या रेकॉर्ड ब्रेक यशानंतर शाहरुख खान डबल रोल साकारत जवान या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून विजय सेतूपती आणि नयनतारा हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
तर कबीर सिंहनंतर 4 वर्षांनी दिग्दर्शक म्हणून संदीप रेड्डी वानगा एनिमल सिनेम घेऊन येणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना, परिणीती चोप्रा, अनिल कपूर, बॉबी देओल प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
IMDb ने जाहीर केलेले उन्हाळ्यातील सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपट
1. जवान (2 जून रिलीज डेट )
2. एनिमल (11 ऑगस्ट रिलीज डेट )
3. आदिपुरुष (16 जून रिलीज डेट )
4. गदर 2 (11 ऑगस्ट रिलीज डेट)
5. छत्रपती (12 मे रिलीज डेट)
6. मैदान (23 जून रिलीज डेट)
7. योद्धा (7 जुलै रिलीज डेट)
8. रॉकी और रानी की प्रेम कहानी (28 जुलै रिलीज डेट)
9. हनुमान (12 मे रिलीज डेट)
10. कस्टडी(12 मे रोजी रिलीज डेट)
गदर- एक प्रेम कथा या ब्लॉक बस्टर सिनेमाचा सिक्वल गदर 2सुद्धा रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. सनी देओल, अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि दिग्दर्शक अनील शर्मा 22 वर्षांनी एकत्र येतील. रणवीर सिंह आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच "रॉकी और रानी की प्रेम कहानी" या सिनेमात एकत्र झळकणार आहेत. तब्बल 7 वर्षांनंतर करण जोहर दिग्दर्शक म्हणून परतेल तर धर्मेंद्र आणि जया बच्चन पाच दशकांनंतर एकत्र काम करणार आहेत