सिनेमा

हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा प्री टिझर भेटीला, चित्रपटाचं प्री टिझर रिलीज!

‘कन्नी’ चित्रपटात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pravina Shirpurkar

मालिका विश्वात प्रेक्षकांवर आपली छाप सोडणारी अभिनेत्री दुर्गळे लवकरच तिच्या नव्या चित्रपटातुन प्रेक्षकांच्या भेटसी येणार आहे. मैत्री, प्रेम अशा विविध छटा असलेला कन्नी हा तिचा चित्रपट लवकच रिलिज होणार आहे.  हसू आणि आसूने भरलेल्या 'कन्नी'चा प्री टिझर भेटीला मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणाऱ्या चित्रपटाचं प्री टिझर सोशल मीडियावर झळकलं आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या प्री टिझरमध्ये हसू आणि आसूही दिसत आहेत. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्यात घनिष्ट मैत्री दिसत असून त्यात अजिंक्य राऊतही दिसत आहे. आता अजिंक्य यांच्या आयुष्यात नेमका का आला असेल आणि यातून या चौघांची मैत्री काय वळण घेणार, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत. दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे 'कन्नी' करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक 'कन्नी' असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही 'कन्नी' सर्वांना एकत्र बांधण्यासाठी ८ मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.''

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!