(फोटो सौजन्य - Instagram)  
मराठी सिनेमा

सुरज चव्हाणने उरकला गुपचूप साखरपुडा, Video शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी...

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून त्याने साखरपुडा केल्याची माहिती दिली आहे. जी ऐकून चाहते खुश झाले आहेत.

सायली ससाणे

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातील विजेता सुरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याला बिग बॉस मराठीमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आणि तो घराघरात पोहोचला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत जेव्हा सूरज चव्हाण विजेता ठरला तेव्हा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक' सिनेमाची घोषणा केली आणि या चित्रपटामध्ये सूरज मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगितले. सूरज चव्हाणचा हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित झाला. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही आणि हा सिनेमा फ्लॉप झाला. अशातच आता सूरज चव्हाणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये सुरजचा साखरपुडा होताना दिसत आहे.

सूरज चव्हाणने केला साखरपुडा?

सूरजने इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केली असून या व्हिडीओमध्ये तो आलिशान गाडीतून, सुटाबुटात मुलीच्या घरी जाताना दिसत आहे. सगळे त्याच स्वागत करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सूरजची बहीणसुद्धा दिसते आहे. त्यानंतर पुढे एक मुलगी पाण्याचा ग्लास घेऊन येते. तिला बघताच क्षणी सूरज लाजेने लालबुंद होतो. सूरजची बहीण त्या मुलीला ओवाळते आणि नंतर सूरज त्या मुलीला सोन्याची अंगठी घालतो. ती मुलगीसुद्धा सूरजला अंगठी घालते. यावरून सूरजचा साखरपुडा झालेला दिसतो. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झालेला दिसत आहे परंतु या व्हिडीओ मध्ये पुढे गंमत आहे. ती काय जाणून घेऊयात.

मात्र, सूरजचा खरंच साखरपुडा झालेला नसून तो झोपेत स्वप्न बघताना दिसत आहे. सूरजची बहीण त्याला झोपेतून उठवते आणि म्हणते, 'उठ लवकर आता! किती वेळ झोपतोयस, त्या घराचं काम बघ. काय त्या उशीचा मुका घेत बसलायस.' त्यावर सूरज म्हणतो, 'झोपूदे की, कसलं भारी स्वप्न पडलेलं', असे म्हणून या व्हिडीओ मध्ये चांगला ट्विस्ट दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत सूरजने, 'अखेर आनंदाचा दिवस उजाडला...' असं कॅप्शन लिहिले आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे. सूरजच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी, 'Congratulations करणारच होतो तेवढ्यात धोका झाला', 'गुलिगत धोका', 'सुरज भाऊ व्हिडिओ पाहून खरंच खूप भारी वाटलं डोळ्यात डोळ्यात पाणी आलं खूप खुश झालो', 'सूरज, अभिनंदन टाइप केलेलं रे पण शेवटी गुलिगत धोका दिलास' अशा मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तसेच काही चाहते त्याला अभिनंदन करत आहेत.

भुशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले सव्वा तीन कोटींचे घबाड; सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या सविस्तर

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला

Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम

Satara News: युती केली नसती तर आमचे सात संचालक निवडून आले असते; जयकुमार गोरे