(फोटो सौजन्य - Instagram)
२०२५ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी खास आहे. या वर्षात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसले आहेत. तसेच आता नुकताच एका मालिका अभिनेत्याने गुपचूप लग्न करून चाहत्यांसोबत माहिती शेअर केली आहे. ‘आई कुठे काय करते’ फेम मालिकेतील अभिनेता निरंजन कुलकर्णीने या मालिकेतील अरुंधतीचा मुला म्हणजेच अभिषेक देशमुखचीने लग्न केले आहे. अश्यातच या अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्याने गुपचूप लग्न करून आता सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
‘Squid Game’ च्या तिसऱ्या आणि शेवटच्या सीझनचा ट्रेलर लाँच, जाणून घ्या वेब सिरीज कधी होणार प्रदर्शित!
‘आई कुठे काय करते’ फेम निरंजन कुलकर्णी लग्नबंधनात अडकला असून इन्स्टाग्रामवर अभिनेत्याने त्याच्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्याचे लग्न हे समुद्रकिनारी पार पडले ज्याचे संपूर्ण दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये निरंजन आणि त्याची पत्नी एकमेकांना वरमाला घालताना दिसत आहेत. निरंजनचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. लग्नाचा व्हिडिओ शेअर करताना निरंजन कुलकर्णीने, ‘आमच्या प्रेमाची नवी सुरुवात’ असे कॅप्शन देखील दिले आहे. आता अभिनेत्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीदेखील त्याला शुभेच्छा देत आहेत. आणि कंमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
निरंजन कुलकर्णीची पत्नी आहे कोण?
निरंजन कुलकर्णीच्या पत्नीचं नाव मनीषा गुरम आहे. ती एक न्यूट्रिशनिस्ट आणि लाइफस्टाइल एक्सपर्ट आहे. मनीषा सोशल मीडियावर सक्रीय असून ती अनेकद कामाबद्दलचे फोटो-व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. दरम्यान, रिसेप्शनसाठी निरंजन आणि त्याच्या पत्नीने इंडोवेस्टर्न लुक तयार केला होता. तर अभिनेत्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. दोघेही लग्नामध्ये खूप सुंदर दिसत होते. त्यांचा लुक पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.
नकुल आणि जानकी पुन्हा होणार आई- बाबा, क्युट बेबी बंपसोबत चाहत्यांना दिली गुड न्यूज!
अभिनेत्याने त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनचा रोमँटिक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी आणि कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव करत या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. निरंजन कुलकर्णीच्या व्हिडिओवर रुपाली भोसले, गौरी कुलकर्णी, अक्षया नाईक, सीमा घोगळे यांसारख्या कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, निरंजन कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, अभिनेत्याने ‘जावई विकत घेणे आहे’, ‘एक थ्रिलर नाईट’, ‘सोल-कढी’ यांसारख्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले आहे.