सिनेमा

"माझा शेवटचा श्वास हा फक्त.." जिनिलियाने खास पोस्ट शेअर करत रितेशला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जिनिलियाने रितेशच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'वेड' चित्रपटाच्या शूटिंग वेळेचे काही खास क्षण टिपण्यात आले आहेत. यात रितेश देशमुखच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा दिसून येत आहेत.

Pooja Pawar

मुंबई : बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसानिमित्त रितेशवर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान रितेशची पत्नी जिनिलिया हिने पती रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सध्या रितेश आणि जिनिलिया या दोघांचा मराठी चित्रपट 'वेड' (Ved Movie)प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. ३० डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून जिनिलिया या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. तर 'वेड' या चित्रपटातून रितेश दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे. जिनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'वेड' चित्रपटाच्या शूटिंग वेळेचे काही खास क्षण टिपण्यात आले आहेत. यात रितेश देशमुखच्या व्यक्तिमत्वातील विविध छटा दिसून येत आहेत.

जिनिलियाने व्हिडीओ पोस्ट करत लिहिले,

मी तुझ्यावर प्रेम करते कारण मी तुझ्यावर प्रेम करते?

कारण तुझ्यावर प्रेम न करणे अशक्य आहे?

मी तुझ्यावर गणनेशिवाय प्रेम करतो, कारण चांगले की वाईट

मला तुझ्यावर प्रेम करणे आणि श्वास घेणे यापैकी निवड करावी लागली

तर मी तुझ्यावर प्रेम करते हे सांगण्यासाठी मी माझा शेवटचा श्वास घेईन

प्रिय @riteishd वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी; दक्षिण कोरियामध्ये करणार प्रतिनिधित्व

Business News : फ्लिपकार्टमध्ये मोठा नेतृत्वबदल; CEO कल्याण कृष्णमूर्ती पद सोडणार; ११ वर्षांच्या प्रवासाला पूर्णविराम

Viral Knife Attack Video : हळदी समारंभात पत्रकारावर चाकूने हल्ला; व्हिडिओ व्हायरल

Dharashiv Water Storage : धाराशिवचा पाणीसाठा 5.14 टक्क्यांवर; आठ महिन्यांचे नियोजन करा! पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Khamgaon: कापूस उत्पादक शेतकरी संभ्रमात! CCI केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा कायम; खासगी व्यापाऱ्यांकडून ५० हजार क्विंटल खरेदी