सिनेमा

पद्मश्री'साठी निवड होणे लांच्छनास्पद', ज्येष्ठ गायिका संध्या मुखर्जींनी पुरस्कार नाकारला

संध्या मुखर्जी यांनी एसडी बर्मन, अनिल बिस्वास,यांच्यासह अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी गाणी गायली आहेत.

Smita Manjrekar

मुंबई : प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी  (Sandhya Mukherjee ) उर्फ संध्या मुखोपाध्याय (Sandhya Mukhopadhyay) यांनी पद्मश्री (padmashri award) पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. या पुरस्काराठी  दिल्लीहून  एका वरिष्ठ अधिका-याचा त्यांना फोन आला होता.पण पद्मश्रीसाठी नामांकित होण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे .

याबबत संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता म्हणाल्या की, 'वयाच्या ९० व्या वर्षी, जवळपास आठ दशकांची गायन कारकीर्द असताना, पद्मश्रीसाठी त्यांची निवड होणे हे लांच्छनास्पद आहे.' पद्मश्री' एखाद्या नवीन कलाकाराला देणं अधिक योग्य आहे ना? की 'गीताश्री' असलेल्या संध्या मुखोपाध्याय यांना? ' त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या गाण्यांच्या सर्व रसिकांनाही तेच वाटतं.

संध्या मुखर्जी यांनी एसडी बर्मन, अनिल बिस्वास, मदन मोहन, रोशन आणि सलील चौधरी यांच्यासह अनेक हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकांसाठीही गाणी गायली आहेत. त्यांना 'बंग बिभूषण' सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

२०१५ मध्ये सलिम खान यांनी देखिल पद्मश्री पुरस्कार नाकारला होता.  त्यांच्या आधी, इतिहासकार रोमिला थापर यांनी 2005 मध्ये पद्मभूषण नाकारला होता.

वयाच्या 90 व्या वर्षी, सुमारे आठ दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या गायन कारकीर्दीत, पद्मश्रीसाठी निवड होणे हे संध्या मुखर्जी यांच्या सारख्या महान गायिकेसाठी अपमानास्पद आहे," अशीच प्रतिक्रिया सध्या त्यांचे चाहतेदेखील व्यक्त करत आहेत.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!