फोटो

मधुराणी झाली भावुक, वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं खास फोटोशूट

Madhurani Prabhulkar: ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून सर्वांच्या मनावर वर्चस्व करणारी अभिनेत्री अर्थात मधुराणी गोखले प्रभुलकर नेहमीच साडीत सुंदर दिसते. मात्र नुकतेच तिने शेअर केलेले फोटो हे खास असून वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी काढल्याने मधुराणी अधिक भावूक झाल्याचे दिसून आले.

दिपाली नाफडे

‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात आणि प्रत्येकाच्या मनात घऱ केलेली अभिनेत्री अर्थात मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणीने अनेक भूमिका केल्या आहेत मात्र तिची अरूंधती ही भूमिका विशेष गाजली. तसं पाहायला गेलं तर मधुराणी फारच कमी पोस्ट सोशल मीडियावर शेअऱ करते. मात्र जेव्हा जेव्हा ती पोस्ट करते तेव्हा चाहत्यांसाठी पर्वणी ठरते. नुकतीचे तिने मलमल कॉटन साडीतील काही फोटो आणि रिल्स शेअर केले आहेत. 

मात्र हे फोटोशूट तिच्यासाठी काही कारणाने खास आहे. तिने कॅप्शनमध्ये तसा उल्लेखही केला आहे. मधुराणी म्हणते, ‘एक छान वेगळं फोटोशूट करायचं बरेच दिवस मनात होतं आणि अचानक ही सगळी टीम जुळून आली...

ह्या उत्साही आणि creative gang चे कौतुक करावं तेवढं कमीच आणि ठिकाण आहे... पुण्यातील भाजी मंडई... माझ्या वडिलांचं व्यवसायाचं ठिकाण. तुळशीबागेत माझं बालपण गेलं त्यामुळे मंडई हा बालपणीचा महत्वाचा भाग....! सकाळसकाळी भाजी लागत असताना केलेलं हे शूट कायम लक्षात राहील’. कसा आहे मधुराणीचा लुक नक्की पाहा आणि तुम्हीही अशी स्टाईल नक्कीच करू शकता. (फोटो सौजन्य - Instagram)

मधुराणीने लव्हेंडर रंगाची कॉटन मलमल साडी नेसली असून तिचा हा लुक कमालीचा आकर्षक आणि लाघवी दिसत आहे. सध्याच्या गरमीमध्ये अशी साडी म्हणजे नक्कीच हलकी आणि एलिगंट दिसून येते.
यासह मधुराणीने लाल रंगाचा कलमकारी ब्लाऊज मिसमॅच केला असून त्याला मागे स्टायलिश लुक देण्यात आला आहे. तुम्हीही मधुराणीच्या स्टाईलवरून प्रेरणा घेऊ शकता.
केसांचा आंबाडा बांधून तिने दोन्ही बाजूने केसांच्या बटा काढल्या आहेत आणि यासह लाल रंगाचे फूल केसात माळून तिचा हा क्लासी लुक शेअर केलाय.
या मलमलच्या साडीसह तिने ऑक्साडाईज्ड दागिने कॅरी केले आहेत आणि त्यावर तिचे मंद हास्य चाहत्यांच्या हृदयाचा नक्कीच ठाव घेताना दिसून येत आहे.
या साडीसह मधुराणीने सिंपल, सोबर मेकअप निवडला असून स्मोकी आईज, हायलायटर, काजळ, कपाळावर लहानशी टिकली आणि न्यूड लिपस्टिक लावली आहे.

Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

भुशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले सव्वा तीन कोटींचे घबाड; सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या सविस्तर

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला

Vastu Tips: इतरांकडून चुकूनही उधार घेऊ नका 'या' वस्तू; घराच्या सुख शांतीवर होऊ शकतो परिणाम