(फोटो सौजन्य: Pinterest)  
फोटो

Asha Bhosle Died: २-४ नव्हे तर तब्बल इतके Filmfare पुरस्कार आशा भोसलेंच्या नावावर! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

बाॅलिवूडच्या सुरिल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी आपल्या चाहत्यांच्या मनावर त्यांची छाप पसरवून त्यांनी जगाचा निरोप घेतला. अचा

नुपूर भगत
आपली थोरली बहिण गायिका लता मंगेशकर यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनीही संगीत जगतात एंट्री घेतली जिथे त्यांच्या आवाजाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक पुरस्कारांसह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या मोजक्या कलाकारांपैकी त्या एक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आशा भोसलेंनी एकूण नऊ फिल्मफेअर आवार्ड्स आपल्या नावावर केले. यापैकी सात पुरस्कार स्पर्धात्मक होते, जे त्यांनी १९६७ ते १९७९ दरम्यान जिंकले.
यासहच १९९६ मध्ये त्यांना 'रंगीला' या चित्रपटासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. आशा भोसलेंना २००१ मध्ये जीवनगाैरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
त्यांना भारताचा सर्वोच्च कला सन्मान असलेल्या दादासाहेब फाल्के पुरस्काराने गौरविण्यात आले. एवढंच काय तर देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्कारानेही त्यांना नावाजले गेले होते.
फक्त देशातच कशाला तर जगातील सर्वात फेमस पुरस्कार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांचे नाव नोंदवण्यात आले. २०११ मध्ये, २० वेगवेगळ्या भाषांमध्ये ११,००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यांची नोंद यात करण्यात आली होती.

Millets: मिलेट्सचे प्रकार कोणते? जाणून घ्या 'या' पौष्टिक धान्यांपासून बनवता येणारे चविष्ट पदार्थ आणि त्यांचे फायदे!

लातूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड; अविनाश जाधव उपाध्यक्षपदी

'बाबा ऐकत नाहीत…', शरद पवारांना अॅडमिट केल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Viral Money Saving Trick: नोट खिशात ठेवण्याची 'ही' ट्रिक पाहिलीय का? पैसे पडणारच नाहीत, VIDEO व्हायरल

Raigad News: ४७ गावं, ३३ आदिवासी वाड्या तहानलेल्या! उमटे धरणाच्या गाळमुक्तीसाठी संघर्ष ग्रुप आक्रमक, १३ कंपन्यांना दिले निवेदन