सौरभ दास यांच्या पासपोर्ट वादावरून अभिजीत दीपके यांची सरकारवर टीका
दोनदा परदेश प्रवास, मग सात वर्षांनंतर हा वाद का- आशुतोष रांका
युवकांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा का होत नाही - आशुतोष रांका
Ashutosh Ranka Exclusive Interview: कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि संस्थापक सदस्य आशुतोष रांका यांनी सौरव दास यांच्या पासपोर्टच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वी ऑक्सफर्ड मधील एका व्याख्यानासाठी सीजेपीचे सहसंस्थापक सौरव दास यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या सौरव दास यांना दिल्ली विमानतळावर पासपोर्टमधील विसंगतीचे कारण दाखवून परदेशात जाण्यापासून अडवण्यात आले आणि त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. याच मुद्द्यावरुन अभिजीत आणि आशुतोष यांनी थेट पंतधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीचा उपस्थित केला. तर आशुतोष रांका यांनी युवकांचे शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभाग या संदर्भात सरकारवर टीका केली.
सौरभ दास यांचा पासपोर्ट २०१९ मध्ये जारी करण्यात आला होता. त्याच पासपोर्टचा वापर करून सौरव यांनी दोनदा परदेश प्रवास केला होता. मग आताच त्यांच्या पासपोर्टमध्ये अशी विसंगती कशी आढळून आली. या प्रकरणी संबंधित विभाग सात वर्षांपासून काय करत आहे, असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती जाहीर करण्यावरून देशात प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण दुसरीकडे एका सामान्य नागरिकाच्या पासपोर्टशी संबंधित माहिती सार्वजनिक कशी केली जाते. "देशात ही कोणत्या प्रकारची व्यवस्था काम करतेय, असाही सवाल अभिजीत दिपकेंनी उपस्थित केला.
दरम्यान, आशुतोष रांका यांनी संभाषणादरम्यान देशातील तरुणांचे महत्त्व आणि त्यांच्या राजकीय भूमिकेवर भर दिला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ७०% तरुण मतदार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. संसद आणि सरकारने देशातील तरुणांना भेडसावणाऱ्या समस्यांचा गांभीर्याने विचार करायला नको का?असा सवाल उपस्थित केला.
आशुतोष यांनी शिक्षण आणि रोजगारासारख्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याच्या गरजेवर भर दिला. गेल्या १० ते १२ वर्षांत सरकारने हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे, तर तरुणांच्या रोजगार आणि शिक्षणाशी संबंधित मुद्द्यांकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
आशुतोष रांका म्हणाले की, फक्त पाच महिन्यांत सीजेपीला तरुणांकडून लक्षणीय पाठिंबा मिळाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीपासून ते एसआयआरसारख्या मुद्द्यांपर्यंत, तरुणांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. आज देशभरातील तरुण आमच्यासोबत उभे आहेत आणि हा पाठिंबा देशात बदलाचा एक नवीन मार्ग प्रशस्त करेल.
सीजेपीचे सह-संयोजक सौरभ दास यांच्या परदेश प्रवासादरम्यान त्यांच्या कागदपत्रांच्या वैधतेवरून त्यांचा पासपोर्ट वादाचा विषय बनला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सौरभ दास यांचा पासपोर्ट २०१९ मध्ये जारी करण्यात आला होता. असे वृत्त आहे की, त्यांनी यापूर्वी याच पासपोर्टचा वापर करून दोनदा परदेश प्रवास केला आहे. मात्र, त्यांच्या अलीकडील परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या पासपोर्टवर आक्षेप घेण्यात आला आणि त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.
अभिजीत दिपके यांनी सौरव दास यांनी केंद्रावर निशाणा का साधला?
सौरव दास यांचा पासपोर्ट २०१९ मध्ये जारी झाला. त्याच पासपोर्टवर दोनदा परदेश प्रवास केला. मग सात वर्षांनंतर आताच विसंगती कशी आढळली, असा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारला आहे.
अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात कोणता मुद्दा उपस्थित केला?
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती जाहीर करण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहे. मग एका सामान्य नागरिकाच्या पासपोर्टशी संबंधित माहिती सार्वजनिक कशी केली जाते, असा सवाल करत त्यांनी व्यवस्थेवर टीका केली आहे.
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आशुतोष रांका यांनी कोणत्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली?
सीजेपीचे संस्थापक सदस्य व सह-संयोजक आशुतोष रांका यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना देशातील युवकांचे शिक्षण, रोजगार आणि राजकीय सहभाग या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीका केली.