काँग्रेस इंडिया आघाडीनेतर सीजेपीचाही डिलीमीटेशन बिलाला विरोध; अभिजीत दिपकेंचे मोठं विधान 
राजकारण

CJP on Delimitation Bill: काँग्रेस इंडिया आघाडीनेतर सीजेपीचाही डिलीमीटेशन बिलाला विरोध; अभिजीत दिपकेंचे मोठं विधान

CJP on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि खासदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रासाठी खंबीर भूमिका घ्यावी, असे आवाहन कॉकरोच जनता पक्षाने (CJP) 'एक्स'वरून केले आहे.

anuradha sagar

सर्व पक्षांना एकत्र येण्याचे सीजेपीचे आवाहन

परिसीमनातील तरुणांच्या स्थानावर प्रश्नचिन्ह

लोकसंख्या आणि संसदीय प्रतिनिधित्वातील तफावत

Delimitation Bill Row: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना कॉकरोच जनता पक्षाने (CJP) सर्व राजकीय पक्ष आणि खासदारांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन सीजेपीकडून करण्यात आले आहे. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत पक्षाने, ‘राजकीय मतभेद बाजूला सारून राष्ट्रासाठी खंबीर भूमिका घ्या आणि पुनर्रचना विधेयकाला विरोध करा,’ असे आवाहन केले.

परिसीमनाच्या नव्या नकाशात तरुणांना स्थान कुठे?

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. परिसीमनाच्या माध्यमातून भाजपला भारताचा निवडणूक नकाशा नव्याने तयार करायचा आहे. मात्र, या नव्या नकाशात देशातील तरुणांना नेमके किती स्थान मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दीपके यांनी आकडेवारीचा हवाला देत सांगितले की, सध्या भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५८ टक्के नागरिक ३५ वर्षांखालील आहेत. २०२९ पर्यंत हे प्रमाण जवळपास ६० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, लोकसंख्येतील एवढा मोठा वाटा असूनही तरुणांचे संसदेतील प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तरुण खासदारांचे प्रमाण अवघे पाच टक्के

दीपक यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या लोकसभेत ३५ वर्षांखालील खासदारांचे प्रमाण केवळ पाच टक्के असून, अशा खासदारांची संख्या २५ आहे. देशाच्या लोकसंख्येत तरुणांचा वाटा जवळपास ५८ टक्के असताना संसदेत त्यांचे प्रतिनिधित्व मात्र पाच टक्क्यांपुरतेच मर्यादित आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

परिसीमनामुळे लोकसभेतील जागांची संख्या वाढवण्याची चर्चा सुरू आहे. मात्र, वाढणाऱ्या जागांपैकी किती जागा तरुण प्रतिनिधींना मिळणार, नव्या संसदेत तरुणांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार का, असे प्रश्न दीपक यांनी उपस्थित केले. मतदारसंघ पुनर्रचनेवर चर्चा सुरू असताना कोणताही राजकीय पक्ष युवा प्रतिनिधित्वाचा मुद्दा ठामपणे का मांडत नाही, असा सवालही त्यांनी केला.

कॉकरोच जनता पक्षाने (CJP) सर्व राजकीय पक्ष आणि खासदारांना कोणते आवाहन केले आहे?

कॉकरोच जनता पक्षाने 'एक्स'वरून पोस्ट करत सर्व राजकीय पक्ष आणि खासदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रासाठी खंबीर भूमिका घ्यावी आणि मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला विरोध करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.

सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी परिसीमनाबाबत कोणता प्रश्न उपस्थित केला आहे?

परिसीमनाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या भारताच्या नव्या निवडणूक नकाशात देशातील तरुणांना नेमके किती स्थान मिळणार, असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.

अभिजीत दीपके यांनी लोकसभेतील तरुण खासदारांबाबत कोणती आकडेवारी मांडली आहे?

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे ५८ टक्के नागरिक ३५ वर्षांखालील आहेत (२०२९ पर्यंत हे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे), मात्र सध्याच्या लोकसभेत ३५ वर्षांखालील खासदारांची संख्या केवळ २५ म्हणजेच अवघे पाच टक्के इतकी आहे.

OR Code कसे काम करते?

Afghanistan Blast: अफगाणिस्तान हादरलं! शाळेजवळील घरात साठवलेल्या डायनामाइटचा भीषण स्फोट; 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 97 जण जखमी

Health tips: दिवसाची सुरुवात करा 'या' तीन ड्रायफ्रूट्सने, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

iPhone Security Warning: iPhone युजर्स सावधान! एका क्लिकमध्ये वैयक्तिक माहिती धोक्यात; Telegram CEO यांनी दिला इशारा

गाडी चालवताना चूक झाल्यास पोलीस गाडी जप्त करू शकतात का? जाणून घ्या हक्क आणि वाहन सोडवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया