काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? 24 दिवसांत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गांवडे यांची नियुक्ती रद्द  Mahila Congress, Maharashtra Congress, Sunita Gawande, Alka Lamba, Maharashtra Politics,
राजकारण

Congress Politics:काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? 24 दिवसांत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष सुनीता गांवडे यांची नियुक्ती रद्द

Congress Politics: २ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या सुनीता आर. गावंडे यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी २६ नोव्हेंबर रोजी आदेश काढून तात्काळ प्रभावाने रद्द केली.

anuradha sagar
  • २४ दिवसांत सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द

  • नेतृत्व व क्षमतेवरून चर्चांना उधाण

  • संघटनात्मक पुनर्बांधणीची पार्श्वभूमी

Maharashtra Mahila Congress Order: अखिल भारतीय महिला काँग्रेसने अवघ्या २४ दिवसांत महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या सुनीता गावंडे यांनी नियुक्ती रद्द केली आहे. राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी २६ नोव्हेंबरला आदेश जारी करत सुनीता गांवडे यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने रद्द केली. २ नोव्हेंबर २०२६ रोजीच गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण चोवीस दिवसांत नियुक्ती रद्द केल्याने महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

२ नोव्हेंबर २०२६ रोजी सुनीता आर. गावंडे यांच्याकडे महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण अवघ्या २४ दिवसांतच ही नियुक्ती रद्द करण्यात आल्याने काँग्रेसच्या संघटनात्मक वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता गावंडे यांची नियुक्तीनंतर त्यांच्या नेतृत्वावर आणि संघटनात्मक जबाबदारीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच थेट राष्ट्रीय नेतृत्वाने नियुक्ती रद्द केल्याने यामागे नेमके काय कारण असावे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत.

महाराष्ट्र महिला काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून संघटनात्मक पातळीवर अनेक घडामोडी सुरू आहेत. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची, संघटनेची पुनर्बांधणी कशी करायची आणि आगामी काळात महिला कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्यासाठी कोणते नेतृत्व योग्य ठरेल, याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता

सुनीता गावंडे यांची नियुक्ती रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता कोणाकडे सोपवली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रीय नेतृत्वाकडून नव्या नियुक्तीबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याची उत्सुकता आहे. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार गावंडे यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय घेण्यामागील कारणांचा सविस्तर उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही.

कोण आहेत सुनीता गावंडे ?

सुनीता गावंडे यांना राजकीय आणि संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस संघटनेत विविध पदांची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षविस्तारासाठी काम केले. २००२ ते २००५ या काळात त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. त्यानंतर २००५ ते २०१६ अशी सलग ११ वर्षे त्यांनी नागपूर ग्रामीण काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात ग्रामीण भागात पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

Navi Mumbai News: नवी मुंबईकरांनो, लक्ष द्या! रेसिंग स्पर्धेमुळे सीवूड्स-नेरुळमधील काही रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते?

येरवडा जेलच्या भिंतीआतून रचला हल्ल्याचा कट?" मंदार किवळेवरील गोळीबारात १९ वर्षांच्या अर्थव मारणेचं कनेक्शन उघड!

JSW मोटर्सची खास घोषणा! डिसेंबरमधील लाँचपूर्वी 500 युनिट्सची लिमिटेड स्पेशल एडिशन सादर

Bigg Boss 20 : स्काउटने लव गिलबद्दल गुल्लूसमोर केला धक्कादायक खुलासा, बिग बॉस २० चा नवा प्रोमो चर्चेत

Share Market Today: आज कोणते शेअर्स चमकणार? टाटा ग्रुपसह या कंपन्यांच्या स्टॉक्सवर ठेवा लक्ष