Sports

भारत लढणार नेपाळशी! नजर टाका आशिया कपच्या गुणतालिकेवर

भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये आज सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. त्याचबरोबर आशिया कपमधील संघ कोणत्या स्थानावर आहेत आणि कोणते संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील यावर एकदा नजर टाका.

शुभांगी मेरे

भारत विरुद्ध नेपाळ : भारताचा संघ आज नेपाळविरुद्ध लढणार आहे. आशिया कपमधील आज भारताचा संघ तिसरा सामना खेळणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध झाला होता. हा सामना भारताच्या महिला क्रिकेट संघाने ७ विकेट्सने जिंकला होता. त्यानं भारताचा सामना युएई विरुद्ध झाला या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने एकतर्फी विजय मिळवून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. आज भारताचा शेवटचा साखळी सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. आजच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने विजय मिळवल्यास सेमीफायनलमध्ये जागा पक्की करणार आहे.

नजर टाका आशिया कपच्या गुणतालिकेवर

आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये चार-चार संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या संघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये श्रीलंका, थायलंड, बांग्लादेश आणि मलेशिया या संघाचा समावेश आहे.

ग्रुप A

पहिल्या गटाच्या गुणतालिकेवर नजर टाकली असता. भारताचा महिला क्रिकेट संघ अव्वल स्थानावर आहे. भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकून ४ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानच्या संघाचे आतापर्यत २ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी १ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झाले आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे नेपाळ आणि युएईचा संघ आहे. नेपाळच्या संघाने २ सामन्यांपैकी १ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर युएईच्या संघ दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

ग्रुप B

दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे. संघाने दोन्ही साखळी सामने जिंकले आहेत. त्यानंतर मलेशियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मलेशियाच्या संघाने २ सामन्यांपैकी १ सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलवर तिसऱ्या स्थानावर बांग्लादेशचा संघ आहे. बांग्लादेशच्या महिला क्रिकेट संघाने आतापर्यत २ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी १ सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. त्यानंतर शेवटच्या स्थानावर थायलंडचा संघ आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये अजुनपर्यत एकही सामना जिंकलेला नाही.

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

Cheapest Gold Rate Across Indian : भारतात सर्वात स्वस्त सोनं कुठे मिळतं? या राज्यांची चर्चा; 22K, 24K वर आहेत आकर्षक ऑफर्स?

Fit India Sunday on Cycle : पुण्यात 'संडे ऑन सायकल'चा शतकमहोत्सव; 50 हजार सायकलप्रेमी सहभागी होणार

Delimitation Bill Approved : मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला हिरवा कंदील; राज्यांतील जागांमध्ये ५०% वाढ

पुण्यनगरीत रंगणार Table Tennis चा थरार! 'या' देशांचे खेळाडू होणार सहभागी, विजेत्याला...