कायरन पोलार्डचा टी 20 मध्ये रेकॉर्ड
टी 20 फॉर्मटमध्ये पूर्ण केल्या 15 हजार रन्स
जोस बटलर आहे पहिल्या स्थानी
Kieron Pollard: सध्या टी 20 फॉर्मटमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. त्यात च आता वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्डने आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड केला आहे. त्याने आपल्या कारकीर्दीचा एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला आहे. टी 20 फॉर्मटमध्ये 15000 रन्स करणारा तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. त्यामुळे पोलार्डचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कायरन पोलार्डने आपल्या टी 20 कारकिर्दीत तब्बल 15000 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. इंटरनॅशनल लीग टी 20 मध्ये एमआई एमिरेट्स संघाकडून खेळताना पोलार्डने ही कामगिरी केली आहे. डेजर्ट वाइपर्सविरुद्ध आपल्या संघाच्या सलामीच्या लढतीपूर्वी कीरोन पोलार्डला १५ हजार धावांचा आकडा गाठण्यासाठी अवघ्या एका रन्सची गरज होती. या सामन्यात पोलार्डने 15 रन्सची लहानशी खेळी केली आणि आपला हा रेकॉर्ड पूर्ण केला.
Kieron Pollard : आरशात पाहून स्वतःलाच देतो कोचिंगचा सल्ला; पोलार्डचा मजेशीर खुलासा
सध्या टी 20 फॉर्मटमध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम हा इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरच्या नावावर आहे. तर आता या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी कायरन पोलार्डचा समावेश झाला आहे. जगभरातील विविध टी२० लीग्समध्ये धडाकेबाज फलंदाजी आणि अष्टपैलू खेळीसाठी पोलार्डला ओळखले जाते.
टी 20 फॉर्मटमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या यादीत इंग्लंडचा जोस बटलर सध्या पहिल्या स्थानी आहे. ट्याच्या नावावर 15,062 रन्स जमा आहेत. तर दुसरीकडे कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या नावे 15,014 रन्स आहेत. पहिल्या स्थानावर जाण्यासाठी पोलार्डला केवळ 48 रन्सची आवश्यकता आहे. तसे त्याने केल्यास तो लवकरच टी 20 फॉर्मटमध्ये पहिल्या स्थानावर दिसून येईल.
कायरन पोलार्ड सध्या एमआई एमिरेट्स संघाचा कर्णधार आहे. तसेच त्याच्याकडे सध्या मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलार्ड यंदाच्या येत्या आयपीएल 2027 च्या हंगामात नवीन जबाबदारीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Rohit Sharma: मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा ‘रोहित पर्व’! हिटमॅनकडे कर्णधारपदाची धुरा? लवकरच मोठी घोषणा
टी 20 फॉर्मटमध्ये विराट कोहलीने निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र सर्वाधिक रन्स करणाऱ्या यादीत त्याचा देखील समावेश आहे. भारताचा स्टार फलंदाज चेस मास्टर विराट कोहली सध्या या यादीत 6 व्या स्थानावर आहे. ट्याच्या नावावर टी 20 फॉर्मटमध्ये 14,218 रन्स आहेत. टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स करणाच्या यादीत सध्या जोस बटलर आणि पोलार्ड यांच्यात स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे.