PAK A Beat BAN A  
Sports

Asia Cup rising Stars: बांग्लादेशला लोळवलं, आता श्रीलंकेचं आव्हान! पाकिस्तानची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; ट्रॉफीसाठी रंगणार महामुकाबला

PAK A Beat BAN A Asia cup final against Sri Lanka: दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

Priyanka Mundinkeri
  • सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा दणका

  • बांग्लादेशला ५ विकेट्सने लोळवले

  • आता श्रीलंकेशी जेतेपदाची लढाई

PAK A Beat BAN A: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ चा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान 'अ' आणि बांग्लादेश 'अ' यांच्यात खेळला गेला. शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी खेळलेल्या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून २३२ धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानने केवळ ५ विकेट्स गमावून ४.४ षटके आधीच लक्ष्य गाठले.

या विजयासह,पाकिस्तानने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता विजेतेपदाच्या सामन्यात पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होईल, श्रीलंकेने पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

पाकिस्तानने बांग्लादेशला चारली धूळ

दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात, बांग्लादेश 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाने आपल्या ५० षटकांत ८ विकेट्स गमावून २३२ धावा केल्या. बांग्लादेशची सुरुवात चांगली झाली नाही, पण दिपू आणि अंकोन यांच्या खेळीने संघाला सावरले .

शहादत होसेन दिपूने शानदार फलंदाजी करत नाबाद शतक झळकावले. तो १०३ धावांवर नाबाद राहिला. महिदुल इस्लाम अंकोननेही ४२ धावांचे योगदान दिले. या दोघांनीही संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.पाकिस्तान 'अ' संघाकडून सुफियान मुकीम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने २९ धावांत तीन विकेट्स घेतले. अली रझा आणि हसन नवाझ यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.

२३३ धावांचे लक्ष्य गाठताना, पाकिस्तान 'अ' संघाची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर पुन्हा अपयशी ठरले आणि २१ धावांवर बाद झाले. शाहजैब खान आणि हसन नवाज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तान 'अ' संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह त्यांनी विजेतेपदाच्या सामन्यातील आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानकडून कर्णधार अब्दुल समदने ३३ चेंडूंमध्ये ४४ धावांची खेळी केली. तर, फरहान युसूफने ३९ चेंडूंमध्ये नाबाद ४६ धावांचे योगदान दिले. बांगलादेश 'अ' संघाकडून रिपन मंडल आणि रकिबुल हसन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. एमडी रुबेलला एक विकेट मिळाला.

विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंका - पाकिस्तान भिडणार

पाकिस्तान 'अ' संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाचव्यांदा प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या कोणत्याही संघासाठी हा एक विक्रम आहे. आता रविवार, २९ नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत.

Bank FD : नोकरीशिवाय दरमहा हवीय मोठी कमाई? 50 लाखांच्या FD वर 7% व्याजाने किती मिळेल उत्पन्न? पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Baramati News: बारामतीत 'अजितदादामय' उत्साह; मॅरेथॉन मार्गावर दादांच्या गाजलेल्या विधानांचे फलक

Jalgaon Municipal Corporation: जमीन आरक्षणातून कोटींचा घोटाळा! नगरसेवक अरविंद देशमुखः मक्तेदारासोबत संगनमताचा केला आरोप

Divyanka Bedi Wedding: बॉलिवूडच्या दिग्गज खलनायकाच्या घरी लगीनघाई! रंजीत यांची मुलगी दिव्यांका अडकली विवाहबंधनात

Space War : चीनच्या मदतीने पाकिस्तान अंतराळात वाढवत आहे लष्करी ताकद; CDS जनरल सुब्रमणी यांचा गंभीर इशारा, मांडली 'ती' 3 मोठी आव्हाने