फोटो सौजन्य - सोशल मिडिया 
Sports

RCB vs SRH : ‘विराट कोहली संपला...' आरसीबीच्या दणदणीत विजयानंतर मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल! ट्रोलर्सचे केले तोंड बंद

गतविजेत्या आरसीबीने पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात फ्रँचायझीसाठी विराट कोहलीच्या बॅटने धुमाकूळ घातला. त्यानंतर सध्या मोहम्मद कैफची एक सोशल मिडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शुभांगी मेरे

आयपीएल २०२६ : आयपीएलच्या १९व्या हंगामाची उत्कंठा सुरू झाली आहे. गतविजेत्या आरसीबीने पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या सामन्यात फ्रँचायझीसाठी विराट कोहलीच्या बॅटने धुमाकूळ घातला. त्याने ३८ चेंडूंमध्ये १८१.५८ च्या स्ट्राईक रेटने ६९ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीने त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्याच्या बॅटमध्ये अजूनही किती ताकद शिल्लक आहे. विराटच्या खेळीनंतर मोहम्मद कैफची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया त्याने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे.

मोहम्मद कैफची पोस्ट व्हायरल झाली

विराट कोहलीच्या शानदार खेळीनंतर, भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याची पोस्ट वाऱ्यासारखी पसरली. त्याने लिहिले, "कल्पना करा, ऑस्ट्रेलियात दोनदा शून्यावर बाद झाल्यानंतर लोक म्हणत होते की विराट कोहली संपला आहे. त्याच्या शेवटच्या १० व्हाईट-बॉल सामन्यांतील धावा खालीलप्रमाणे आहेत... ७४, १३५, १०२, ६५, १३१, ७७, ९३, २३, १२४, आणि या सामन्यात ६९ नाबाद." या वक्तव्याद्वारे कैफने त्याच्या वाढत्या वयावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना लक्ष्य केले.

विराट कोहली आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. इतर कोणत्याही फलंदाजाने ८,००० धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. या मोसमातील त्याचा फॉर्म पाहता, तो ९,००० धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरेल असे दिसते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही त्याने जोरदार फटकेबाजी करत आपला फॉर्म कायम ठेवला. या खेळीत त्याने पाच चौकार आणि पाच उत्तुंग षटकार ठोकले. आरसीबीचा पुढील सामना ५ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे.

कोहली, देवदत्त पडिक्कल आणि रजत पाटीदार यांनी एसआरएचसाठी शानदार फलंदाजी केली. पडिक्कलने २६ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. फिल सॉल्ट (८) लवकर बाद झाल्यानंतर, कोहली आणि पडिक्कलने दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. आरसीबीने पॉवरप्लेमध्ये ७६ धावा केल्या होत्या आणि ८.१ षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला. पडिक्कल हेनरिक क्लासेनच्या गोलंदाजीवर बाद झाला, ज्याने यापूर्वी कोहली २८ धावांवर असताना हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्याचा झेल सोडला होता. कर्णधार पाटीदारने १२ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. अखेरीस कोहलीने १६ व्या षटकात हर्षल पटेलच्या चार चेंडूंवर एक षटकार आणि तीन चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

Mohammed Shami: 'मी आता विचार...'; टीम इंडिया अन् वर्ल्डकपबाबत शामीने धक्कादायक विधान

उपवासाच्या वेळी शेंगदाणे का खावेत? जाणून घ्या फायदे

Fluffy pancakes recipe: सोशल मीडियावर गाजतायत जपानी फ्लफी पॅनकेक्स, घरीच बनवा मऊ, स्पंजी आणि जाडसर पॅनकेक्स!

Satwai Puja: बाळाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी स्वस्तिकावर का झोपवतात नवजात बालकाला? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Political News : 'सुप्रिया सुळेंसुद्धा १५० कोटी मिळालेत का?' संजय शिरसाट यांचा संजय राऊतांना टोला