Youth Artistic Gymnastics : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत शुभदा भाबरेची सुवर्णभरारी; महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, पश्चिम बंगालचेही वर्चस्व 
Sports

Youth Artistic Gymnastics : जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत शुभदा भाबरेची सुवर्णभरारी; महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, पश्चिम बंगालचेही वर्चस्व

पहिल्या युवा राष्ट्रीय कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या शुभदा भाबरेने तीन सुवर्णपदकांसह ऑल-अराउंड विजेतेपद पटकावले. ग्रेड 8 आऊट-एजमध्ये महाराष्ट्राने सांघिक विजेतेपद मिळवले, तर इन-एजमध्ये पश्चिम बंगालने बाजी मारली.

Rakesh Khedekar
  • शुभदा भाबरेची ऑल-अराउंड प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी

  • अनइव्हन बार, बॅलन्स बीम आणि फ्लोअर एक्सरसाइजमध्ये सुवर्ण

  • ग्रेड 8 आऊट-एजमध्ये महाराष्ट्राचे सांघिक विजेतेपद

Youth Artistic Gymnastics : पहिल्या युवा राष्ट्रीय कलात्मक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला गटात महाराष्ट्राच्या शुभदा भाबरेने शानदार कामगिरी करत तीन सुवर्णपदकांसह वैयक्तिक ऑल-अराउंड विजेतेपद पटकावले. तसेच ग्रेड 8 आऊट-एज गटात महाराष्ट्राने सांघिक विजेतेपदावर नाव कोरले. पश्चिम बंगालच्या पौलमी रॉयने ग्रेड 8 इन-एज गटात वैयक्तिक ऑल-अराउंड विजेतेपद मिळवले. या गटाचे सांघिक विजेतेपदही पश्चिम बंगालने पटकावले. मालाड येथील आयएनएस हमला येथे ही स्पर्धा सुरू आहे.

पुरुष गटातील स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर महिला गटातील स्पर्धेला सुरुवात झाली. ग्रेड 80 आऊट-एज सांघिक गटात महाराष्ट्राने 113.750 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. हरियाणाने 112.250 गुणांसह दुसरे, तर मणिपूरने 104.550 गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

वैयक्तिक ऑल-अराउंड प्रकारात महाराष्ट्राच्या शुभदा भाबरेने 42.900 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. हरियाणाच्या उत्सवीने 40.900 गुणांसह रौप्य, तर महाराष्ट्राच्या अवनी घाडीने समान गुणांसह कांस्यपदक मिळवले. शुभदाने उपकरणांच्या अंतिम फेरीतही आपला दबदबा कायम ठेवला. अनइव्हन बार, बॅलन्स बीम आणि फ्लोअर एक्सरसाइज या तीन प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. हरियाणाच्या उत्सवीने 12.450 गुणांसह व्हॉल्ट प्रकारात सुवर्ण मिळवले.

सांघिक गटात बंगालची बाजी

ग्रेड 8 इन-एज सांघिक गटात पश्चिम बंगालने 129.750 गुणांसह विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राने 126.300 गुणांसह दुसरे, तर ओडिशाने 118.600 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. पश्चिम बंगालच्या पौलमी रॉयने 45.150 गुणांसह वैयक्तिक ऑल-अराउंड विजेतेपद जिंकले. महाराष्ट्राच्या मायरा श्रीवास्तवने 42.900 गुणांसह रौप्य, तर पश्चिम बंगालच्या रिशिका गांगुलीने 42.800 गुणांसह कांस्यपदक पटकावले.

पौलमीनला बॅलन्समध्ये सुवर्णपदक

पौलमीने बॅलन्स बीम प्रकारात सुवर्णपदक मिळवले. व्हॉल्ट आणि फ्लोअर एक्सरसाइजमध्ये तिने दुसरे स्थान मिळवले. तेलंगणाच्या कोठी वेदिता रेड्डीने अनइव्हन बारमध्ये, तर पश्चिम बंगालच्या रिशिका गांगुलीने व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक पटकावले. तिचीच सहकारी सृजनी दासने फ्लोअर एक्सरसाइजमध्ये बाजी मारली. महिला गटातील स्पर्धा 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

मध्यरात्री दीड वाजता रक्ताचा सडा! आईला त्रास देणाऱ्या सख्ख्या भावावर कुऱ्हाडीचे वार अन्...

Home tips: नवीन आठवड्याची सुरुवात करा फ्रेश मूडमध्ये! रविवारी करा 'Sunday Reset', घरासोबत स्वतःचीही घ्या काळजी

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक

Kabaddi Tournament : अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत; स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळाची विजयी आगेकूच