वसई-विरार महापौर मॅरेथॉन 13 डिसेंबरला
5 हजारांहून अधिक ज्युनियर धावपटूही घेणार सहभाग
58 लाख रुपयांची पारितोषिके; स्पर्धेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था
Vasai Virar Mayors Marathon : देशातील नामांकित धावपटू आणि हौशी धावपटूंचे आकर्षण असलेल्या 13 व्या राष्ट्रीयस्तरीय वसई-विरार महापौर मॅरेथॉनचे आयोजन 13 डिसेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत 9 हजारांहून अधिक नोंदणीकृत धावपटूंसह 5 हजारांपेक्षा अधिक ज्युनियर धावपटू सहभागी होणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता उंच उडीपटू सर्वेश कुशारे या स्पर्धेचा शुभारंभ करणार असून, तो स्पर्धेचा इव्हेंट अॅम्बेसेडरही असेल.
वसई-विरार शहर महानगरपालिका आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल 58 लाख रुपयांची पारितोषिके स्पर्धेत दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे, केवळ भारतीय खेळाडूंसाठी आयोजित होणाऱ्या या स्पर्धांमध्ये देशातील सर्वाधिक पारितोषिक रकमेपैकी एक रक्कम दिली जाते. वसई-विरार परिसरातील धावपटूंसाठी स्वतंत्र पारितोषिक निधीची तरतूदही कायम ठेवण्यात आली आहे.
पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये लष्कराचा तीर्था कुमार पुन याच्यासह मोहम्मद राठोड, प्रदीपसिंग चौधरी, दिनेश सिंह, अर्जुन कुमार आणि निखिल संतोष सिंह यांसारखे आघाडीचे धावपटू सहभागी होणार आहेत. तीर्था कुमार पुन याची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 2 तास 17 मिनिटे 15 सेकंद आहे. तर मोहम्मद राठोड याच्या नावावर 2 तास 18 मिनिटे 5 सेकंदांचा स्पर्धा विक्रम आहे.
पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये सुनील कुमार, साहिल सागर आणि मुकेश कुमार यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा विशाल बनसोडे याच्यासह दाजी हुबळे, तन्मय पवार आणि ईश्वर झिरवळ हेही पदकासाठी प्रयत्न करतील. महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या तेजस्विनी लांबकाने आणि रवीना गायकवाड यांच्यासह दिल्ली हाफ मॅरेथॉनमधील पदकविजेत्या लिली दास, प्रीती आणि सोनिका परमार सहभागी होणार आहेत.

धावपटूंच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार विशेष मॅरेथॉन गाड्या सोडण्यात येणार आहेत. पहिली गाडी पहाटे 2.30 वाजता, तर दुसरी गाडी पहाटे 3 वाजता चर्चगेटहून सुटेल. धावपटूंसाठी वैद्यकीय पथके, सात कार्डियाक रुग्णवाहिका, 14 वैद्यकीय केंद्रे आणि मार्गावर 40 डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येणार आहे.