AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स  
विज्ञान तंत्रज्ञान

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Moto G Stylus 5G 2026 Launched: स्मार्टफोन बाजारात नवा खेळाडू दाखल झाला आहे. कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्समुळे फोनची मागणी वाढण्याची शक्यता आहे. दमदार स्पेसिफिकेशन्समुळे हा स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष वेधत आहे.

हर्षदा जाधव
  • Moto G Stylus (2026) मध्ये 6.7-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले आणि इन-बिल्ट Stylus दिला आहे.
  • फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर, 50MP Sony कॅमेरा आणि AI फीचर्स मिळतात.
  • 5200mAh बॅटरीसह हा स्मार्टफोन सुमारे 46 हजार रुपयांत लाँच झाला आहे.

Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने आणखी एक मोठा धमाका केला आहे. कंपनीने Moto G Stylus (2026) नावाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवा फोन मोटोरोलाच्या Stylus लाइनअपमधील लेटेस्ट डिव्हाईस आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड दिले आहेत. लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये शार्प डिस्प्ले, अधिक चांगली ड्यूरेबिलिटी, AI-बेस्ड फीचर्स आणि एक मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने हा स्मार्टफोन मिडरेंज किंमतीत लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊ.

Moto G Stylus 5G 2026 ची किंमत

मोटोरोलाने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची किंमत USD 499.99 म्हणजेच सुमारे 46,190 रुपये ठेवण्यात आली आहे. 16 एप्रिलपासून स्मार्टफोनची विक्री सुरु होणार असून ग्राहक हा स्मार्टफोन बेस्ट बाय, ॲमेझॉन, मोटोरोला आणि गूगल फायवरून खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – Motorola) 

Moto G Stylus 5G 2026 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच 1.5K एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील दिला आहे. फोनमध्ये 10-बिट कलर आणि 5000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये खास वॉटर टच टेक्नोलॉजीचा देखील वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही ओल्या हातांनी देखील फोनचा वापर करू शकणार आहेत.

इन-बिल्ट अ‍ॅक्टिव Stylus

कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये सर्वात खास इन-बिल्ट अ‍ॅक्टिव Stylus आहे, जे टिल्ट आणि प्रेशर सेंसिटिविटीला सपोर्ट करते. इन-बिल्ट अ‍ॅक्टिव Stylus मोटोरोलाच्या नोट्स अ‍ॅपसह इंटीग्रेट करण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्केच टू ईमेज आणि हँडराईटिंग कॅल्क्युलेटर सारख्या AI टूल्सचा वापर करू शकता. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्विक क्लिप, हवर टू मॅग्नीफाई आणि सर्कल टू सर्च फीचर्स देखील दिले आहेत.

परफॉर्मंस आणि प्रोसेसर

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 (4nm) चिपसेट देखील दिला आहे. या फोनमध्ये एड्रेनो 710 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर 5एक्स रॅम आणि 128 जीबी यूएफएस 3.1 स्टोरेज देखील मिळणार आहे.

बॅटरी आणि चार्जिंग सपोर्ट

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5200mAh बॅटरी देखील दिली आहे.

कॅमेरा

मोटोरोलाच्या नव्या डिव्हाईसमध्ये OIS आणि ऑल-पिक्सेल ऑटोफोकस वाला 50MP सोनी लिटिया 700C प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 13MP चा अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो कॅमेरा देखील दिला आहे. या नव्या डिव्हाईसमध्ये 3-इन-1 लाइट सेंसर देखील दिला आहे. जो एक्सपोजर अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करतो. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 32MP चा कॅमेरा दिला आहे, जो ग्रुप फोटो काढताना फ्रेमिंग आपोआप एडजस्ट करू शकतो. तसेच, या डिव्हाइसमध्ये फोटो एन्हांसमेंट इंजिन, सुपर झूम, ॲक्शन शॉट आणि पोर्ट्रेट मोड यांसारखी एआय वैशिष्ट्येही आहेत.

Shraddha Kapoor Marathi Look: ५ लाखांचा चोकर, दीड लाखांची साडी अन्... श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची किंमत ऐकून बसेल धक्का!

Maharashtra Zero Bureaucracy: महाराष्ट्रात 'शून्य नोकरशाही' उपक्रमाला सुरुवात! UAE च्या धर्तीवर १७४ डिजिटल सेवांचा शुभारंभ

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीसह आता काँग्रेसमध्येही फोडाफोडी होण्याची शक्यता