नव्या स्टोअरमध्ये अॅपलचे लेटेस्ट प्रोडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध असणार
कंपनीने त्यांच्या आगामी स्टोअरसाठी बॅरिकेड डिझाईन देखील रिव्हील केले
नव्या स्टोअरमध्ये फ्री इन-स्टोर सेशन्स देखील उपलब्ध
टेक जायंट कंपनी Apple तेलंगणातील हैद्राबादमध्ये त्यांचे पहिले रिटेल स्टोअर ओपन करण्याची तयारी करत आहे. याबाबत घोषणा देखील करण्यात आली आहे. Apple Kukatpally नावाचे हे अॅपल स्टोअर भारतातील सातवे रिटेल आऊटलेट असणार आहे. या नव्या स्टोअरसह कंपनी देशातील दक्षिणी भागात त्यांचा विस्तार करणार आहे. या नव्या स्टोअरमध्ये अॅपलचे लेटेस्ट प्रोडक्ट्स खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच ग्राहक या नव्या स्टोअरमध्ये टेक्निकल सपोर्टचा लाभ देखील घेऊ शकतात. या नव्या स्टोअरमध्ये फ्री इन-स्टोर सेशन्स देखील उपलब्ध असणार आहेत.
नुकत्याच जारी करण्यात आलेल्या एका प्रेस रिलीजद्वारे कंपनीने घोषणा केली आहे की, अॅपल कुकटपल्ली स्टोअर 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ग्राहकांसाठी खुले होणार आहे. हे स्टोअर हैद्राबादमधील कुकटपल्ली येथील लेक शोर-वाय जंक्शन मॉलमध्ये आहे. हे स्टोअर कंपनीचे हैद्राबाद शहरातील पहिले रिटेल स्टोअर आणि भारतातील सातवे आऊटलेट असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने त्यांच्या आगामी स्टोअरसाठी बॅरिकेड डिझाईन देखील रिव्हील केले आहे. यामध्ये इरिडेसेंट कलर्ससह पर्ल-इंस्पायर्ड अॅपल लोगो पाहायला मिळणार आहे, जे मोती व्यापाराशी हैदराबादचा असलेला दीर्घकालीन संबंध दर्शवते. स्टोअर सुरु होण्यापूर्वी, कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी अॅपल कुकटपल्ली वॉलपेपर्स आणि स्टिकर्स उपलब्ध केले आहेत. कंपनीने हैद्राबादमधील संगीत आणि स्थानिक स्वरांपासून प्रेरित एक खास अॅपल म्युझिक प्लेलिस्ट देखील तयार केली आहे.
हैद्राबादमध्ये कंपनीची रिसर्च एंड डेवलपमेंट आणि रिटेल कस्टमर केयर टीम देखील उपलब्ध असणार आहे. या नवीन स्टोअरमुळे या प्रदेशात ॲपलची किरकोळ विक्री उपस्थिती अधिक विस्तारण्याची अपेक्षा आहे.
कंपनीच्या प्रोडक्ट रेंजमधील आयफोन 18 प्रो, आयफोन 18 प्रो मॅक्स आणि आयफोन ड्युओसह इतर प्रोडक्ट हैद्राबादमधील स्टोअरमध्ये उपलब्ध असणार आहेत. ग्राहक या स्टोअरमध्ये इतर डिव्हाईस देखील एक्सप्लोअर करू शकतात, ज्यामध्ये PROLED XDR डिस्प्ले आणि टचसह मॅकबुक प्रो, ॲपल वॉच सिरीज 12, ॲपल वॉच अल्ट्रा 4, एअरपॉड्स 5, होमव्ह्यू आणि होमपॉड मिनी 2 यांचा समावेश आहे.
ग्राहक स्पेशलिस्ट्स, क्रिएटिव्स, जीनियस आणि डेडिकेटेड बिजनेस टीमकडून एक्सपर्ट मार्गदर्शन घेऊ शकतात आणि टूडे ॲट ॲपल सेशन्समध्ये सहभागी होऊ शकता. ग्राहक फोटोग्राफी, व्हिडीओ क्रिएशन आणि ड्रॉइंगवर फोकस्ड क्रिएटिव वर्कशॉप्स देखील अटेंड करू शकतात.