आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा  
विज्ञान तंत्रज्ञान

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

आता लवकरच आयफोन यूजर्सना एक नवीन अनुभव मिळणार आहे. जे यूजर्स आतापर्यंत केवळ आयफोनमधील Siri चा वापर करत होते, त्यांना एक नवीन आणि अपग्रेडेड असलेले व्हॉईस असिस्टेंट वापरण्याची संधी मिळणार आहे.

हर्षदा जाधव
  • Apple ची Siri या शर्यतीत खूपच मागे
  • थर्ड-पार्टी व्हॉईस असिस्टेंचा मिळणार सपोर्ट
  • Siri मध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड करण्याची योजना

गेल्या काही काळापासून AI व्हॉईस असिस्टेंट्स जसे गूगलचे Gemini आणि OpenAI चे ChatGPT अधिक वेगवान आणि अ‍ॅडव्हांस झाले आहेत. मात्र Apple ची Siri या शर्यतीत खूपच मागे आहे. त्यामुळे Apple आता आयफोन यूजर्ससाठी एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. कंपनी लवकरच त्यांच्या ग्राहकांना एक खास सुविधा देणार आहे.

नवीन iOS अपडेटमध्ये मिळणार कमाल फीचर

खरं तर Apple ने त्यांच्या डेवलपर डॉक्यूमेंटेशनमध्ये कंफर्म केलं आहे की, iPhone यूजर्स लवकरच Siri ऐवजी थर्ड-पार्टी व्हॉईस असिस्टेंटचा वापर करू शकणार आहेत. यूजर्स iPhone च्या साइड बटनचा वापर करून थेट कोणत्याही थर्ड-पार्टी व्हॉईस असिस्टेंटला अ‍ॅक्टिव्हेट करू शकणार आहेत. ही सुविधा डेवलपर्सने अ‍ॅप अपडेट केल्यानंतरच योग्य पद्धतीने काम करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

या यूजर्सना मिळणार नवीन फीचर

सध्या हे फीचर जगातील इतर कोणत्याही देशात उपलब्ध असेल की नाही याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. मात्र कंपनीने अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की, हा ऑप्शन सध्या तरी केवळ जपानमधील आयफोन युजर्ससाठी रिलीज केला जाणार आहे. यासाठी, यूजर्सचे Apple अकाऊंट रीजन जपानमध्ये सेट करणे आवश्यक आहे आणि डिव्हाइस देखील जपानमध्ये असणे आवश्यक आहे.

रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, Apple ने हे पाऊल जपानमधील मोबाइल सॉफ्टवेअर कॉम्पिटिशन ॲक्ट गाईडलाइन्स उचललं आहे. असं देखील सांगितलं जात आहे की, कंपनी हे बदल स्थानिक नियमांचे पालन करूनच करणार आहे. हे बदल कोणत्याही ग्लोबल पॉलिसी अतंर्गत केले जात नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर, Apple आयफोन यूजर्ससाठी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. आता यूजर्स सिरीऐवजी थर्ड-पार्टी व्हॉईस असिटंटचा वापर करू शकणार आहेत. नवीन iOS अपडेटमध्ये यूजर्सना ही सुविधा मिळणार आहे. सध्या हे फीचर केवळ जापानमधील यूजर्ससाठी उपलब्ध आहे. सिरी अपग्रेड करण्यासाठी अ‍ॅपलने गुगलच्या जेमिनी मॉडेलचा वापर करण्याची योजना आखली आहे.

Google Gemini सह कशी अपग्रेड होणार Siri

तर, जगभरातील यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple Siri मध्ये मोठ्या प्रमाणात अपग्रेड करण्याची योजना आखत आहे. अहवाल असेही सूचित करतात की Apple पुढील वर्षी Siri साठी Google चे Gemini मॉडेल वापरण्यासाठी अंदाजे 1 बिलियन डॉलरचे पेमेंट करणार आहे.

💡Frequently Asked Questions

Que: Siri म्हणजे काय?
Ans: Siri हा Apple चा व्हॉईस असिस्टंट आहे जो तुमचे आदेश ऐकून कामे करतो.

Que: कोणत्या Apple डिव्हाइसेसवर Siri उपलब्ध आहे?
Ans: iPhone, iPad, Apple Watch, Mac, HomePod, AirPods आणि CarPlay वर Siri वापरता येते.

Que: Siri कशी सुरू करायची?
Ans: आपण "Hey Siri" म्हणू शकता किंवा iPhone च्या साइड बटनला लाँग-प्रेस करून Siri सुरू करता येतो.

Amruta Khanvilkar Launches Amulya: अभिनयासोबत आता व्यवसायातही बाजी! अमृता खानविलकरची 'अमुल्य' साडी बॉलिवूडपर्यंत पोहोचली

Health tips: सतत जंक फूड खाताय? वेळीच व्हा सावध! शरीराला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

उत्तर प्रदेशात जागावाटपावरून काँग्रेस-समाजवादी पक्षात संघर्ष; अखिलेश यादवांचं 'ते' विधान चर्चेत

Mahabharat Katha: शिखंडी कोण होता? अंबाचा पुनर्जन्म आणि भीष्मांच्या पतनाची रंजक कथा जाणून घ्या

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले