हल्ली प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंट करणं सोयीस्कर समजतं. कॅश बाळगणं, सुट्ट्या पैशांसाठी भांडण करणं, या सगळ्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट बेस्ट ऑप्शन ठरतो. आपण बँकेचे सर्व व्यवहार देखील फोनमधूनच करतो. तुम्हाला क्वचितच असा एखादा दुकानदार सापडेल, ज्याच्याकडे ऑनालईन पेमेंट केलं जातं नाही. भाजीवाले, किराणा स्टोअर्स, मेडिकल, मॉल्स, केक शॉप सर्वत्र ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे. पण हे ऑनलाईन पेमेंट केवळ आपल्या फोनमुळे शक्य होते.
आपल्याकडे फोनचं नसेल, तर आपण ऑनलाईन पेमेंट करूच शकत नाही. पण कधी आपला फोन चोरीला गेला किंवा हरवला तर कोणत्याही ठिकाणी आपण ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. तसेच फोन चोरीला गेल्यास आपल्या UPI आयडीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात आधी आपला UPI आयडी ब्लॉक करणं महत्त्वाचं असतं. पण हा UPI आयडी कसा ब्लॉक करायचा हे अनेकांना माहिती नसते. UPI आयडीच्या गैरवापरामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. पण आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या स्टेप्सने तुमचा UPI आयडी कसा ब्लॉक करू शकता.
Google Pay वर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
- सर्वात आधी तुम्ही इतर कोणत्याही फोनवरून 18004190157 नंबर डायल करा आणि कस्टमर केअरसोबत बोला.
- कस्टमर केअरला तुम्ही संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देऊ शकता, ज्यामुळे तुमचा UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी मदत होते.
- तुम्ही दिलेल्या माहितीनंतर कस्टमर केअर तुमच्या ओळखीची तपासणी करतात.
- यानंतर ग्राहक सेवा अधिकारी तुमचा Google Pay आयडी ब्लॉक करतो.
PhonePe वरून UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
- तुम्ही PhonePe वर देखील तुमचा UPI आयडी ब्लॉक करू शकता, यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
- PhonePe वरून UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला 02268727374 किंवा 08068727374 वर कॉल करावा लागेल.
- यानंतर तुम्ही कस्टमर केअर ऑफिसरशी बोलून त्यांना संपूर्ण प्रकाराबाबत माहिती देऊ शकता, ज्यामुळे तुमचा UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी मदत होते.
- यानंतर ग्राहक सेवा अधिकाऱ्याला तुमची सर्व माहिती दिली जाते.
- यानंतर तुम्ही तुमचा UPI आयडी PhonePe वरून ब्लॉक करू शकता.
पेटीएम वरून UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
- पेटीएमवर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला शेवटचा फोन पर्याय निवडावा लागेल
- यानंतर तुम्हाला विनंती केलेले सर्व तपशील भरावे लागतील.
- पेटीएम वेबसाइटवर जाऊन तुम्हाला 24 X 7 मदत पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि तेथे काही माहिती द्यावी लागेल.
- ज्यामध्ये तुमचा फोन हरवल्याचा पोलीस अहवालही असेल.
- या प्रोसेसनंतर तुमचे पेटीएम खाते तात्पुरते ब्लॉक केले जाईल.