BSNL ने सादर केला 51 रुपयांचा नवीन प्लॅन! 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार 2GB डेटा, केवळ 'या' यूजर्सना मिळणार फायदा  
विज्ञान तंत्रज्ञान

BSNL ने सादर केला 51 रुपयांचा नवीन प्लॅन! 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार 2GB डेटा, केवळ 'या' यूजर्सना मिळणार फायदा

BSNL New Plan: बीएसएनएलने एक नवीन फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) सादर केले आहे. या कूपनची किंमत 51 रुपये आहे. हा प्लॅन केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, याबाबत आता जाणून घेऊया.

हर्षदा जाधव
  • बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला

  • प्लॅनमध्ये ग्राहकांना भरपूर डेटा ऑफर केला जाणार

  • प्लॅन केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध

भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 51 रुपये आहे. कंपनीचा हा नवीन रिचार्ज प्लॅन नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. हा एक प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत सुमारे एका महिन्याची आहे. कंपनीच्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना भरपूर डेटा ऑफर केला जाणार आहे. लक्षात ठेवा की, हा 51 रुपयांचा हा प्लॅन एक फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) आहे आणि हा प्लॅन जुन्या ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळणार, याबाबत जाणून घेऊया.

बीएसएनएलच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणार हे फायदे

बीएसएनएलच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 51 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना दररोज 1.82 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2GB डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. हा प्लॅन केवळ नवीन यूजर्ससाठी उपलब्ध आहे. हा एक फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) आहे, जो सर्व टेलीकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)

बीएसएनएल चे 1 रुपयांचे फर्स्ट रिचार्ज कूपन

याव्यतिरिक्त, बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना एक 1 रुपयांचे फर्स्ट रिचार्ज कूपन (FRC) देखील ऑफर करते. यामध्ये 24 दिवसांची सर्विस व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. या प्लॅनचा खर्च दररोज सुमारे 0.04 रुपये होतो. या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 24GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये देखील यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत.

बीएसएनएलचे हे दोन्ही फर्स्ट रिचार्ज कूपन नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी काही परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना 4G नेटवर्कचा अनुभव घेताना संकोच करण्याची गरज भासू नये. बीएसएनएल त्यांच्या 4G नेटवर्कचा विस्तार करत आहे. इतर कोणताही टेलिकॉम ऑपरेटर ग्राहकांसाठी इतक्या परवडणाऱ्या किंमतीत फर्स्ट रिचार्ज कूपन उपलब्ध करून देत नाही. याव्यतिरिक्त कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 107 रुपयांचा प्लॅन देखील उपलब्ध आहे, जो 20 दिवसांची सर्विस व्हॅलिडीटी ऑफर करतो. यामध्येस ग्राहकांना 3GB डेटा आणि 200 मिनिटांचे व्हॉईस कॉलिंग देखील मिळणार आहे.

Navi Mumbai News: नवी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर; महापालिकेच्या कारभारावर टीका

नवे कपडे घालून लग्नाला निघाले, पण वाटेतच काळाने गाठलं! खराडीच्या रिव्हरडेल चौकात भयंकर अपघात

December Horoscope: डिसेंबरमध्ये या राशींच्या लोकांवर होणार लक्ष्मीची कृपा, लक्ष्मी नारायण योगामुळे मिळणार आर्थिक लाभाच्या संधी

कारमधून 'ते' दोघे आले, अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवलं अन् नंतर...; अपहरणाचा थरारक प्रकार समोर

पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे