नव्या सुरुवातीसाठी उपयुक्त टेक गिफ्ट्स
लग्नातील भेटवस्तू केवळ समारंभापुरत्या मर्यादित न राहता नवदाम्पत्यांच्या दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडणाऱ्या असाव्यात. एकत्र चित्रपट पाहण्यासाठी साउंडबार, संगीताचा आनंद घेण्यासाठी ब्लूटूथ स्पीकर किंवा दैनंदिन आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टवॉच अशा टेक गॅजेट्समुळे पारंपरिक भेटवस्तूंना एक आधुनिक पर्याय मिळू शकतो. कार्यक्षमता आणि मनोरंजन यांचा संगम साधणारी ही गॅजेट्स नव्या संसाराच्या सुरुवातीला एक उपयुक्त भेट ठरू शकतात.
लग्नाच्या हंगामाला सुरूवात
मित्रमैत्रिणीला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का?
गॅझेट्स आहेत उत्तम पर्याय
लग्नसराईचा हंगाम सुरू झाला की नवदाम्पत्यांना कोणती भेट द्यावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. पारंपरिक भेटवस्तू आणि घरगुती सजावटीच्या वस्तूंपेक्षा दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या टेक गॅजेट्सना सध्या पसंती मिळत आहे. एकत्र चित्रपट पाहण्यापासून संगीताचा आनंद घेण्यापर्यंत आणि दैनंदिन आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, ही गॅजेट्स नव्या जोडप्यांच्या जीवनात उपयोगी ठरू शकतात. अशाच पाच टेक गिफ्ट्सची माहिती जाणून घेऊया.
संगीताची आवड असणाऱ्या जोडप्यांसाठी किंवा घरी छोटेखानी पार्टी आयोजित करणाऱ्यांसाठी boAt Stone 900 हा एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. यामध्ये 80W boAt Signature Sound, दोन 3.5-इंच फुल-रेंज ड्रायव्हर्स आणि दोन 1-इंच ट्वीटर देण्यात आले आहेत. यामुळे दमदार ऑडिओ अनुभव मिळतो. यामध्ये म्युझिकसोबत सिंक होणारे Dynamic RGB LED Lights, Bluetooth 5.3 कनेक्टिव्हिटी, AUX आणि USB सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच 15 तासांपर्यंत प्लेबॅक आणि IPX5 वॉटर रेझिस्टन्स रेटिंगमुळे इनडोअर तसेच आउटडोअर वापरासाठी हा स्पीकर उपयुक्त ठरतो.
घरातील टीव्ही आणि एंटरटेनमेंटचा ऑडिओ अनुभव अधिक चांगला करू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी Zebronics Zeb-Juke Bar 3800 Pro हा आणखी एक पर्याय आहे. यामध्ये 84W साउंड आउटपुट देण्यात आले आहे. चित्रपट, टेलिव्हिजन शो आणि संगीत ऐकण्यासाठी हा साउंडबार उपयुक्त ठरू शकतो. विविध कनेक्टिव्हिटी पर्यायांमुळे इतर एंटरटेनमेंट डिव्हाइसेससोबत जोडणेही सोपे होते.
नवीन घरात एकत्र चित्रपट पाहणे किंवा आवडत्या वेब सीरिजचा आनंद घेणे पसंत करणाऱ्या जोडप्यांसाठी boAt Aavante Prime X हा प्रीमियम साउंडबार पर्याय ठरू शकतो. यामध्ये 700W RMS आउटपुट आणि Dolby Atmos सपोर्ट देण्यात आला आहे. 8-इंच सबवूफर आणि 12 हाय-परफॉर्मन्स ड्रायव्हर्समुळे इमर्सिव्ह ऑडिओ अनुभव मिळतो. यामध्ये Detachable TWS Satellite Speakers आणि Wireless Subwoofer देण्यात आले आहेत. Bluetooth 5.3, HDMI (e-ARC), AUX, USB आणि Optical कनेक्टिव्हिटीसह 14.5 तासांपर्यंत प्लेबॅकची सुविधाही उपलब्ध आहे.
दैनंदिन फिटनेस आणि अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवू इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी Noise ColorFit Pro 2 हा बजेट-फ्रेंडली स्मार्टवॉच पर्याय आहे. यामध्ये कलर टचस्क्रीन डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्मार्ट नोटिफिकेशन्स आणि दीर्घ बॅटरी लाइफमुळे दैनंदिन वापरातही हे स्मार्टवॉच उपयुक्त ठरते.
कॉम्पॅक्ट आणि जागा कमी व्यापणारा ऑडिओ सेटअप पसंत करणाऱ्यांसाठी Portronics Decibel 23 हा पर्याय विचारात घेता येईल. यामध्ये 16W साउंड आउटपुट आणि Bluetooth कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. संगीत तसेच इतर मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी हा साउंडबार उपयुक्त आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे घरातील दैनंदिन वापरासाठी तो सोयीस्कर ठरतो.
लग्नातील भेटवस्तू केवळ समारंभापुरत्या मर्यादित न राहता नवदाम्पत्यांच्या दैनंदिन आयुष्यातही उपयोगी पडणाऱ्या असाव्यात. एकत्र चित्रपट पाहण्यासाठी साउंडबार, संगीताचा आनंद घेण्यासाठी ब्लूटूथ स्पीकर किंवा दैनंदिन आरोग्याचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टवॉच अशा टेक गॅजेट्समुळे पारंपरिक भेटवस्तूंना एक आधुनिक पर्याय मिळू शकतो. कार्यक्षमता आणि मनोरंजन यांचा संगम साधणारी ही गॅजेट्स नव्या संसाराच्या सुरुवातीला एक उपयुक्त भेट ठरू शकतात.