गॅजेट

Infinix Hot 30i Launched: कमी किंमत, जबरदस्त बॅटरी! फक्त 9 हजारांच्या आतला 'हा' फोन ठरतोय बजेट किंग

Infinix ने आपला बजेट स्मार्टफोन Hot 30i अवघ्या 8,999 रुपयांत लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचांचा HD+ डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, MediaTek Helio G37 प्रोसेसर, 16GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.

Riddhi Vanne
  1. Infinix Hot 30i ची किंमत फक्त 8,999 रुपये.

  2. 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा.

  3. 16GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज

बजेट फोन घ्यायचा विचार करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Infinix ने आपला सगळ्यात स्वस्तातला नवा फोन बाजारात आणला Infinix Hot 30i. किंमत कमी ठेवायसाठी कंपनीने यात 120Hz ऐवजी 90Hz चा डिस्प्ले दिला. पण बाकी स्पेस बघितले तर फोन खरंच पैसा वसूल वाटतो. यात MediaTek Helio G37 चिप, 16GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळतं. चला, या फोनची पूर्ण माहिती बघू.

• Hot 30i कितीला मिळणार आणि कधी?

1. किंमत किती - हा फोन फक्त 8,999 रुपयांना मिळणार आहे. ही किंमत 8GB रॅम + 128GB स्टोरेज वाले मॉडेलची आहे.

2. रंग कोणते - फोन 3 रंगात येणार आहे - काळा, निळा आणि ऑरेंज.

3. कुठे मिळणार - हा फोन फ्लिपकार्टवर मिळेल. विक्री 3 एप्रिल 2023 ला दुपारी बरोबर 12 वाजता सुरू होणार आहे.

• या फोनमध्ये काय- काय आहे?

1. स्क्रीन - 6.6 इंचाची मोठी HD+ IPS LCD स्क्रीन. 90Hz रिफ्रेश रेट आहे, त्यामुळे स्क्रोल करताना अडकल्यासारखं वाटणार नाही. ब्राइटनेस 500 nits पर्यंत जातो.

2. प्रोसेसर - आतमध्ये MediaTek Helio G37 प्रोसेसर दिलाय. रोजची कामं, व्हिडिओ, सोशल मीडिया यासाठी एकदम ठीक आहे.

3. रॅम-स्टोरेज - 8GB खरी रॅम + 8GB व्हर्च्युअल मिळून 16GB पर्यंत जाते. स्टोरेज मेमरी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येतं.

4. कॅमेरा - मागे 50MP चा मेन कॅमेरा + AI लेन्स आहे. पुढे सेल्फीसाठी 5MP कॅमेरा दिलाय.

5. बॅटरी - 5000mAh ची मोठी बॅटरी आहे. 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट पण आहे. कंपनी म्हणते, एकदा चार्ज केला की दिवसभर आरामात चालेल.

• Xiaomi ने पण 2 स्वस्त फोन आणले

फक्त Infinix नाही, Xiaomi ने पण ग्लोबल मार्केटमध्ये 2 नवे बजेट फोन लॉन्च केलेत.

1. Redmi A2 - यात 6.52 इंच HD+ LCD डिस्प्ले, MediaTek Helio G36 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी आहे.

2. Redmi A2+ - याचे स्पेस जवळपास A2 सारखेच आहेत. फक्त यात फिंगरप्रिंट सेन्सर सारखा एक-दोन जास्तीचा फीचर मिळतो.सांगायचं तर, 9-10 हजारच्या बजेटमध्ये फोन बघत असाल तर हे तीनही फोन एकदा नक्की चेक करा.

Maruti DDiS 1.3 Engine: डीजल कारचा तो काळ संपला! BS6 नियम आणि वाढत्या किमतींमुळे मारुतीचे 'हे' इंजिन का झाले इतिहासजमा?

सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर हक्क? राज्य सरकारचा मोठा निर्णय

Swami Samarth world record : अहिल्यानगरच्या स्वामी समर्थ केंद्राचा जागतिक विक्रम! एकाच वेळी २७ हजार भाविकांचे सामूहिक पारायण

Relationship tip: नात्यात भावनिक आधार असणे का महत्त्वाचे? जाणून घ्या आनंदी नात्याचे रहस्य

Devendra Fadnavis: अमली पदार्थांच्या नेटवर्कवर सरकारचा मोठा प्रहार! जिल्हास्तरीय कामगिरीचे नियमित मूल्यमापन होणार