टेक कंपनी गूगलने गेल्या आठवड्यात Gemma 4 आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) मॉडेल सादर केले आहे. मागील काही मॉडेल्सच्या तुलनेत Gemma 4 मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. मागील मॉडेल Gemma 3 चा फोकस टेक्स्ट आणि विजुअल रीजनिंग कॅपेबिलिटीजवर होता. मात्र आता टेक कंपनीचं असं म्हणणं आहे की, कंपनीने सादर केलेल्या नवीन ओपन-सोर्स मॉडेलमध्ये एजेंटिक कॅपेबिलिटीज आणि अॅडवांस्ड रीजनिंग दिले आहे. नवीन मॉडेल 4 वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध असणार आहे. नवीन लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) गुगलच्या डेव्हलपर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. ते थर्ड-पार्टी रिपॉझिटरीजमधून डाउनलोड करून स्थानिक पातळीवर चालवता येते.
एका ब्लॉग पोस्टमध्ये टेक दिग्गजने Gemma 4 AI मॉडेलची घोषणा केली आहे. तसेच या पोस्टमध्ये नवीन मॉडेलबाबत सविस्तर माहिती शेअर करण्यात आली आहे. हे नवीन मॉडेल चार वेगवेगळे आकार आणि कॉन्फिगरेशनमध्ये उपलबध आहे, ज्यामध्ये इफेक्टिव 2B (E2B), इफेक्टिव 4B (E4B), 26B मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स (MoE) आणि 31B डेन्स यांचा समावेश आहे. याचे कॉन्टेक्स्ट विंडो देखील वाढवून 256K टोकन करण्यात आले आहे, जे Gemma 3 मध्ये 128K टोकन होते. याव्यतिरिक्त, त्याला 140 हून अधिक भाषांमध्ये नेटिव्हली प्रशिक्षित केले गेले आहे. (फोटो सौजन्य – YouTube)
मागील मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. Gemma 4 आता परमिशिबल Apache 2.0 लाइसेंस अंतर्गत उपलब्ध असणार आहे. यामुळे त्याचा वापर शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. LLM चा वापर थेट गुगल एआय स्टुडिओ आणि व्हर्टेक्स एआयद्वारे केला जाऊ शकतो. ते कंपनीच्या हगिंग फेस, कॅगल आणि ओलामा सूचीमधून डाउनलोड केले जाऊ शकते.
एडवांस्ड रीजनिंग, एजेंटिक वर्कफ्लो आणि कोड जेनरेशनसाठी सपोर्ट अशा तीन महत्त्वाच्या वैशिष्ट्यांनी Gemma 4 सुसज्ज आहे. एडवांस्ड रीजनिंगसह नवीन मॉडेल मल्टी-स्टेप प्लॅनिंग आणि डीप लॉजिकसाठी देखील सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे मॉडेल गणित आणि सूचनांचे पालन करण्यात चांगली कामगिरी करते. हे मॉडेल फंक्शन कॉलिंग आणि स्ट्रक्चर्ड JSON आउटपुट देण्यासाठी देखील सक्षम आहे. ज्यामुळे यूजर्स या मॉडेलचा वापर करून त्यांचे AI एजेंट्स आणखी पावरफुल बनवू शकणार आहेत. गुगलने असा दावा केला आहे की, हे LLM हाय-क्वालिटी ऑफलाइन कोडला सपोर्ट करते. या मॉडेलचे आणखी एक नोटेबल फीचर म्हणजे यामध्ये व्हिडिओ आणि प्रतिमांवर मूळ स्वरूपात प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.