भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?  
विज्ञान तंत्रज्ञान

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

भारतीय संशोधकांची मोठी कामगिरी! प्रकाशातही ऊर्जा साठवणारे सूक्ष्म उपकरण विकसित केले. लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी हा शोध फायद्याचा ठरणार आहे. 1. नव्या तंत्रज्ञानाची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

हर्षदा जाधव
  • संशोधकांनी प्रकाशाच्या संपर्कात ऊर्जा साठवण क्षमता वाढवणारे सूक्ष्म सुपरकॅपॅसिटर विकसित केले
  • उपकरणाची कामगिरी प्रकाशात लक्षणीयरीत्या वाढल्याचे प्रयोगांमध्ये दिसून आले
  • तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात स्मार्ट कपडे, लहान वैद्यकीय संवेदक, इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक प्रणालींमध्ये होऊ शकतो

भारतीय आणि ब्रिटीश संशोधकांनी लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी अधिक कार्यक्षम, जलद-चार्ज होणाऱ्या आणि टिकाऊ ऊर्जा-साठवण प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. भारतीय विज्ञान संस्था, आयआयटी मुंबई, इंद्रप्रस्थ इन्स्टट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी दिल्ली आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील संशोधकांनी प्रकाशाच्या संपर्कात ऊर्जा साठवण क्षमता वाढवणारे सूक्ष्म सुपरकॅपॅसिटर विकसित केले आहे. या संशोधनात टायटॅनियम सेर्सक्वऑक्साइड या पदार्थावर हायड्रोजन प्रक्रिया करून त्याचे गुणधर्म सुधारण्यात आले. या उपकरणाची कामगिरी प्रकाशात लक्षणीयरीत्या वाढल्याचे प्रयोगांमध्ये दिसून आले आहे.

नेमके संशोधन काय आहे?

मोबाइल उपकरणे, स्मार्ट घड्याळे, वैद्यकीय संवेदक आणि घालण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक्स यांचा आकार कमी होत असताना त्यांना ऊर्जा पुरवणारी उपकरणेही लहान आणि कार्यक्षम असणे आवश्यक आहे. पारंपरिक सूक्ष्म सुपरकॅपॅसिटरमध्ये ऊर्जा साठवण क्षमता आणि कार्यक्षमतेच्या काही मर्यादा आहेत. या मर्यादा दूर करण्यासाठी संशोधकांनी टायटॅनियमवर आधारित विशिष्ट पदार्थाचा वापर केला. संशोधकांनी टायटॅनियम सेक्विऑक्साइडच्या नॅनो-कणांवर हायड्रोजन आणि आगॉन वायूंच्या नियंत्रित मिश्रणात ४०० अंश सेल्सिअस तापमानावर प्रक्रिया केली.  (फोटो सौजन्य – AI Created) 

५,००० चक्रांनंतरही ८८ टक्के क्षमता

या पदार्थांचा वापर करून संशोधकांनी चिपवर बसवता येईल असे सपाट सूक्ष्म सुपरकॅपॅसिटर तयार केले. प्रयोगांमध्ये या उपकरणाची विशिष्ट धारिता १३.५ मिलिफॅरड प्रति चौरस सेंटीमीटर नोंदवण्यात आली. कार्बन-आधारित सूक्ष्म सुपरकॅपॅसिटरच्या तुलनेत ही कामगिरी सुमारे सातपट असल्याचे संशोधन अहवालात नमूद केले आहे. उपकरणाचा टिकाऊपणाही तपासण्यात आला. सलग ५,००० चार्ज-डिस्चार्ज चक्रांनंतर त्याने सुरुवातीच्या धारितेच्या जवळपास ८८ टक्के क्षमता टिकवून ठेवली. यामुळे वारंवार चार्ज आणि डिस्चार्ज कराव्या लागणाऱ्या लहान उपकरणांसाठी या तंत्रज्ञानाची उपयुक्तता अधोरेखित होते.

भविष्यातील उपयोग काय ?

या तंत्रज्ञानाचा भविष्यात स्मार्ट कपडे, लहान वैद्यकीय संवेदक, इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणे आणि सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक प्रणालींमध्ये उपयोग होऊ शकतो. प्रकाशाचा वापर करून ऊर्जा-साठवण कामगिरी वाढवण्याची क्षमता या उपकरणांना अधिक कार्यक्षम बनवण्यास मदत करू शकते. मात्र, व्यावसायिक वापरासाठी त्याची दीर्घकालीन स्थिरता, उत्पादन खर्च आणि प्रत्यक्ष परिस्थितीतील कामगिरी तपासणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

kamathipura: कामाठीपुरा बदलणार! पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग, नोंदणी केंद्र सुरू

IND vs NZ: आधी संघाला सावरले, मग इतिहास घडवला! ५० व्या कसोटीत Tom Blundellचा धमाका; भारताविरुद्ध झळकावले ऐतिहासिक अर्धशतक

IFFI Gala Premiere : IFFI 2026 मध्ये मराठी चित्रपटाचा डंका; ‘तू आहेस ना’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

Shevgaon Water Issue : शेवगावच्या हक्काचा एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही! ​ॲड. शिवाजीराव काकडेंचा प्रशासनाला खणखणीत इशारा

Colgate Visible White Purple : जाहिरातींऐवजी आता थेट ड्रामा सिरीज! कोलगेट व्हिजिबल व्हाइट पर्पलची ६ भागांची मायक्रो-ड्रामा सिरीज लाँच