फीचर्सचा जलवा आणि बॅटरीची कमाल... नवा Oppo स्मार्टफोन यूजर्ससाठी ठरणार खास, किंमत केवळ इतकी  
विज्ञान तंत्रज्ञान

फीचर्सचा जलवा आणि बॅटरीची कमाल... नवा Oppo स्मार्टफोन यूजर्ससाठी ठरणार खास, किंमत केवळ इतकी

Oppo A6k Launched: कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेटवर आधारित आहे. Oppo A6k मध्ये 6.75-इंच डिस्प्ले दिला आहे आणि यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

हर्षदा जाधव
  • Oppo A6k मध्ये 7,000mAh बॅटरी आणि 45W सुपरवूओक फास्ट चार्जिंग दिले आहे.
  • फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत RAM मिळते.
  • 50MP ड्युअल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन चीनमध्ये सुमारे 27 हजार रुपयांपासून लाँच झाला आहे.

Oppo Smartphone Launched: Oppo च्या A6 सीरीजमध्ये आणखी एका नव्या स्मार्टफोनचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A6k या नावाने चीनमध्ये लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 3 वेगवेगळ्या रंगात आणि 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनमध्ये कोणते खास फीचर्स देण्यात आले आहेत आणि त्याची किंमत काय आहे, याबाबत जाणून घेऊया.

Oppo A6k ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये Oppo A6k स्मार्टफोन 8GB+256GB, 8GB + 512GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 8GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 27,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 8GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,399 म्हणजेच सुमारे 32,000 रुपये ठेवली आहे. Oppo A6k तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये डॉन गोल्ड, सीशेल व्हाइट आणि ट्वाइलाइट ब्लू (चीनी भाषेतून अनुवादित) यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनची विक्री चीनमध्ये सुरु करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – Oppo) 

Oppo A6k चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डुअल सिम असलेला Oppo A6k 5G स्मार्टफोन कलरओएस 15.0 वर चालतो. या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ (720x1,570 पिक्सेल) डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आणि टच सँपलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. कंपनीने दावा केला आहे की, या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 1,125 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये Oppo A सीरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेटसह 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज दिले आहे.

नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Oppo A6k 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम लेंस समाविष्ट आहे. रियर कॅमेरा यूनिट 10x पर्यंत डिजिटल झूमला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Oppo A6k मध्ये 5G, वाई-फाई 5, ब्लूटूथ 5.4, बेईडू, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि हे डिव्हाईस फेशियल रिकग्निशनला देखील सपोर्ट करते. यामध्ये एम्बिएंट लाइट सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, एक्सेलेरोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे सेंसर दिले आहेत. धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी या स्मार्टफोमध्ये IP69 + IP68 + IP66 रेटिंग दिली आहे. Oppo A6k मध्ये 7,000mAh बॅटरीसह 45W सुपरवूओक वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Shraddha Kapoor Marathi Look: ५ लाखांचा चोकर, दीड लाखांची साडी अन्... श्रद्धा कपूरच्या मराठमोळ्या लूकची किंमत ऐकून बसेल धक्का!

Maharashtra Zero Bureaucracy: महाराष्ट्रात 'शून्य नोकरशाही' उपक्रमाला सुरुवात! UAE च्या धर्तीवर १७४ डिजिटल सेवांचा शुभारंभ

Todays Gold-Silver Price: सोन्या - चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! 27 नोव्हेंबरचे नवे दर जाहीर, जाणून घ्या

Numberlogy: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? राष्ट्रवादीसह आता काँग्रेसमध्येही फोडाफोडी होण्याची शक्यता