IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर  
विज्ञान तंत्रज्ञान

IMC 2026: इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये नवे Snapdragon चिपसेट सादर! फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये होणार मोठे बदल? जाणून घ्या सविस्तर

दिल्लीमध्ये आयोजित ईव्हेंटमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 हे दोन चिपसेट्स सादर करण्यात आले आहेत. हे नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले असल्याची माहिती क्वालकॉमने दिली आहे.

हर्षदा जाधव
  • क्वालकॉमने सादर केले स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6
  • दोन्ही चिपसेट्स 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले
  • नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करणार

दिल्लीमध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आले आहे. या ईव्हेंटदरम्यान क्वालकॉमने स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 हे दोन चिपसेट भारतात सादर केले आहेत. या ईव्हेंटमध्ये काही स्मार्टफोन ब्रँड्सने या नव्या चिप्सवर आधारित असणाऱ्या त्यांच्या आगामी डिव्हाईसचा प्रीव्ह्यू देखील सादर केला आहे.

क्वालकॉम स्नॅपड्रॅगन समिट

खरं तर हे चिपसेट्स सुरुवातीला सप्टेंबरमध्ये आयोजित क्वालकॉमच्या 'स्नॅपड्रॅगन समिट'मध्ये सादर करण्यात आले होते. दोन्ही चिपसेट्स 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आले आहेत. या चिपसेट्समध्ये कंपनीचा कस्टम Oryon सीपीयू आर्किटेक्चर मिळणार आहे. क्वालकॉमने ऑन-डिव्हाईस आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय), गेमिंग, कॅमेरा प्रोसेसिंग आणि कनेक्टिविटीमध्ये काही सुधारणा हायलाईट केल्या आहेत.  (फोटो सौजन्य: X) 

नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करणार

क्वालकॉमने दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन प्लॅटफॉर्म्स जास्त ॲडव्हांस एआय अनुभवाला सपोर्ट करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. यामध्ये असे एजेंट्स समाविष्ट आहेत, जे यूजरची पसंती समजू शकतात आणि जास्त पर्सनलाइजेशनसह काम पूर्ण करू शकतात. एक्सट्रिम व्हेरिअंट या श्रेणीतील सर्वोच्च स्थानावर आहे, तर 'स्टँडर्ड जेन 6' चा उद्देश अनेक प्रीमियम स्मार्टफोन्समध्ये 'फ्लॅगशिप' दर्जाची वैशिष्ट्ये उपलब्ध करून देणे हा आहे.

या आगामी स्मार्टफोन्सला मिळणार चिपसेटचा सपोर्ट

भारतात आयोजित करण्यात आलेल्या या ईव्हेंटमध्ये मोटोरोला, आयक्यूओओ आणि शाओमीने स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 ने सुसज्ज असलेले आगामी स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आयक्यूओओने या ईव्हेंटमध्ये आगामी फ्लॅगशिप आयक्यूओओ 16 सादर केलास जो एक्सट्रिम व्हेरिअंटवर काम करतो. कंपनीने संकेत दिले आहेत की, हा स्मार्टफोन लवरकच भारतात लाँच केला जाणार आहे.

क्वालकॉमने काय सांगितलं?

प्रेजेंटेशनदरम्यान क्वालकॉमने सांगितलं की, स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रीम जेन 6 चे प्रमुख सीपीयू कोअर्स 5GHz ची कमाल फ्रिक्वेन्सी गाठू शकतात. कंपनीने ओवरऑल सिस्टम-ऑन-चिप (SoC) पावर एफिशिएंसीमध्ये 10 टक्के सुधारणा झाल्याचा दावाही केला आहे. क्वालकॉमचं असं म्हणणं आहे की, हे चिपसेट 40 टक्के उत्तम जीपीयू पावर एफिशिएंसी आणि 37 टक्के उत्तम सीपीयू पावर एफिशिएंसी ऑफर करणार आहे. कंपनीने जीपीयू परफॉर्मेंसमध्ये 144 टक्के सुधारणा केल्याचा दावा देखील केला आहे. क्वालकॉमने म्हटलं आहे की, हे चिपसेट त्याच्या हेक्सागॉन एलिमेंट ॲक्सिलरेटरचा वापर करून 30 अब्जाहून अधिक पॅरामीटर्स असलेले मिक्सचर-ऑफ-एक्सपर्ट्स मॉडेल्स थेट डिव्हाईसवर चालवू शकतो.

Shyam Sharanam: श्रद्धा, आणि भक्तीचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार ‘श्याम शरणम्’मधून! हिंदी-गुजरातीत होणार प्रदर्शित

200MP कॅमेरा अन् नवीनतम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Honor 5G स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष; जाणून घ्या किंमत आणि इतर डिटेल्स

Konkan Tradition: सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीची प्रसिद्ध लोटांगण जत्रा; जाणून घ्या अनोखी परंपरा आणि धार्मिक महत्त्व

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ आता घरबसल्या पाहता येणार, आला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला व चिमुकल्यांसह १७ जणांना विषबाधा