विज्ञान तंत्रज्ञान

Reliance Jio चा ग्राहकांसाठी अलर्ट जारी; सावध रहा अन्यथा सायबर फसवणुकीला बळी पडाल

टेलिकॉम कंपनी reliance jio ने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये कंपनीने सांगितलं आहे की, सायबर स्कॅमर्स reliance jio चे प्रतिनिधी बनून ग्राहकांना फोन करून त्यांची फसवणूक करत आहेत. स्कॅमर वापरकर्त्यांची फसवणूक कशी करतात आणि युजर्सला ही समस्या कशी टाळता येईल याबद्दल कंपनीने माहिती दिली आहे.

हर्षदा जाधव

भारतातील आघडीच्या टेलिकॉम कंपन्यामध्ये jio, Airtel आणि vi चा समावेश होतो. कंपन्या त्यांच्या युजर्सना नेहेमी बेस्ट प्लॅन्स ऑफर करतात. त्यामुळे त्यांच्या युजर्स संख्येत लक्षणीय वाढ होताना पाहायला मिळतं आहे. कंपन्या ग्राहकांना बेस्ट प्लॅन्स ऑफर करण्यासोबतच त्यांच्या यूजरच्या सुरक्षेची देखील तेवढीच काळजी घेतात. Reliance Jio ने नुकताच त्यांच्या युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. यामध्ये jio ने युजर्सना सायबर स्कॅमर्स पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

कंपनीने म्हटले आहे की, jio चे प्रतिनिधी म्हणून सायबर स्कॅमर्स ग्राहकांना कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे त्यांचे वैयक्तिक तपशील विचारतात. याच पार्श्भूमीवर jio ने आपल्या ग्राहकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि थर्ड पार्टी ॲप्स टाळण्याचा आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आपल्या ग्राहकांना चेतावणी देताना, jio ने एका संदेशात म्हटले आहे की, jio मध्ये तुमची सुरक्षा ही आमच्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाची असते. अलीकडे, आम्ही सायबर फसवणुकीची प्रकरणे पाहिली आहेत जिथे स्कॅमर तुमच्या टेलिकॉम कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपली ओळख सांगतात आणि ग्राहकांना वैयक्तिक माहिती विचारतात. स्कॅमर वापरकर्त्यांची फसवणूक कशी करतात हे देखील कंपनीने स्पष्ट केले. याशिवाय युजर्सला ही समस्या कशी टाळता येईल याबद्दलही कंपनीने सांगितले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, स्कॅमर तुमच्याशी कॉल, एसएमएस, व्हॉट्सॲप चॅट किंवा ईमेल अशा अनेक मार्गांनी संपर्क साधू शकतात. हे स्कॅमर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार तपशील, बँक खाते तपशील, क्रेडिट कार्ड तपशील, OTP किंवा सिम नंबर यासारखी संवेदनशील आणि वैयक्तिक माहिती विचारतात. ही महिती देण्यास तुम्ही त्यांना नकार दिल्यास, ते तुमच्या सेवा बंद करण्याची धमकी देतात, जेणेकरून तुम्ही घाबरून त्यांच्याशी माहिती शेअर कराल. याशिवाय, स्कॅमर तुम्हाला थर्ड-पार्टी ॲप्स डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्यास सांगू शकतात, ज्यामुळे त्यांना तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर आणि तुमच्या वैयक्तिक तपशीलांमध्ये प्रवेश मिळेल. jio ने असेही म्हटले आहे की आमची कंपनी कधीही आपल्या ग्राहकांना थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करण्यास सांगणार नाहीत. तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर तो स्कॅम असू शकतो. त्यामुळे ग्रहकानी सुरक्षित राहण गरजेचं आहे.

सुरक्षित कसे राहण्यासाठी या टीप्स फॉलो करा.

  • संशयास्पद लिंक्स किंवा attachment वर क्लिक करणे टाळा.
  • तुमची वैयक्तिक माहिती विचारणाऱ्या ईमेल, संदेश किंवा कॉलला कधीही प्रतिसाद देऊ नका.
  • स्कॅमर तुम्हाला तुमचा फोन ॲक्सेस करण्यासाठी ॲप वापरण्यास सांगू शकतात. अशा परिस्थितीत हे ॲप्स डाउनलोड करू नका.
  • याशिवाय तुमचा सिम नंबर कोणाशीही शेअर करू नका.
  • तुमच्या ॲप आणि ऑनलाइन खात्यांसाठी एक अद्वितीय पासवर्ड आणि पिन वापरा.
  • तुमचे डिव्हाइस सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत राहा आणि ते अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करणे टाळा.

नाद करा पण कोल्हापूरचा कुठं! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले विजेतेपद; तर 'या' संघांना थेट...

Bhandara News: गावोगावी विहिरी बनल्या कचराकुंड्या! साकोली-भंडाऱ्यात जुन्या विहिरींच्या पुनरुज्जीवनाची गरज...

Skin Care Tips: सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप

बनावट कागदपत्रे, नियमबाह्य वाहतूक अन् अवैध मालवाहतूक; खासगी ट्रॅव्हल्सच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Nepal Teacher Viral Video: 'दिलरुबा दिलनशीं' गाण्यावर नेपाळी टीचरचा मुलांसोबत भन्नाट ठेका; VIDEO पाहून नेटकरी फिदा