फोटो सौजन्य - pinterest 
विज्ञान तंत्रज्ञान

सार्वजनिक WI-FI चा वापर करत असाल तर आत्ताच सावध व्हा! सरकारने जारी केला अलर्ट

आपला इंटरनेट डेटा संपवण्यापेक्षा अनेक लोकं फ्री WI-FI वापरण्याला प्राधान्य देतात. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक WI-FI लावले जातात. काही लोकं तासंतास हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI आपल्या फोनला कनेक्ट करून ठेवतात. पण हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनला कनेक्ट केल्यास तुमचा फोन हॅक देखील होऊ शकतो.

हर्षदा जाधव

फ्री WI-FI वापरणं कोणाला नाही आवडत? आपला इंटरनेट डेटा संपवण्यापेक्षा अनेक लोकं फ्री WI-FI वापरण्याला प्राधान्य देतात. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप किंवा मॉल अशा अनेक ठिकाणी सार्वजनिक WI-FI लावले जातात. आपल्याला नेटवर्क नसेल किंवा आपल्या फोनमधील रिचार्ज संपला असेल तर बऱ्याचदा आपण या WI-FI ला कनेक्ट करतो. WI-FI मुळे आपली अनेक कामं अगदी सहज होतात. इतकंच काय तर ह्या WI-FI वर आपण युट्यूब व्हिडीओ किंवा इंस्टाग्रामच्या रिल्स देखील पाहू शकतो.

काही लोकं तासंतास हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI आपल्या फोनला कनेक्ट करून ठेवतात. पण हा फ्रीचा सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनसाठी धोकादायक ठरू शकतो. सार्वजनिक WI-FI तुमच्या फोनला कनेक्ट केल्यास तुमचा फोन हॅक देखील होऊ शकतो. तुमच्या फोनमधील डेटा अगदी सहज हॅकर्सपर्यंत पोहोचतो. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या WI-FI वर नेहमीच हॅकर्सचे लक्ष असते. हॅकर्स सार्वजनिक WI-FI च्या मदतीने लोकांचे फोन हॅक करू शकतात. सार्वजनिक ठिकाणी WI-FI वापरणाऱ्या युजर्सना माहितीही नसते आणि हॅकर्स त्यांच्या डिव्हाइसमधून त्यांचा वैयक्तिक आणि महत्त्वाचा डेटा चोरतात.

याबाबत आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने लोकांना सार्वजनिक WI-FI वापरताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. मंत्रालयाच्या वतीने, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सार्वजनिक WI-FI चा वापर करणाऱ्यांसाठी काही टीप्स शेअर केल्या आहेत. या टिप्स लक्षात ठेवून, तुम्ही स्वतःला आणि तुमचे डिव्हाइस हॅकर्सपासून सुरक्षित ठेवू शकता. याबाबत CERT-In ने एक पोस्ट केली आहे.

CERT-In ने शेअर केलेल्या टीप्स-

  • नेहमी लक्षात ठेवा की, तुमचे डिव्हाइस सार्वजनिक WI-FI शी कनेक्ट करण्यापूर्वी, नेटवर्कचं नाव आणि तेथील कर्मचाऱ्यांकडून संबंधित WI-FI सोबत लॉग-इन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
  • सार्वजनिक WI-FI वापरताना कधीही ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग किंवा कोणतीही संवेदनशील ॲक्टिव्हिटी करू नका.
  • ऑनलाइन शॉपिंग आणि बँकिंगसाठी, नेहमी लक्षात ठेवा की फक्त त्याच साइट वापरा ज्या http:// ने सुरू होतात.
  • काही महत्त्वाचे काम असल्याशिवाय सार्वजनिक WI-FI चा वापर करणं टाळा.
  • तुमचं काम पूर्ण होताच तुमच्या डिव्हाइसवरून सार्वजनिक WI-FI ताबडतोब डिस्कनेक्ट करा.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये OS आणि अँटी-व्हायरस नेहमी अपडेट ठेवा. ज्यामुळे तुमच्या फोनचं हॅकर्सपासून संरक्षण होण्यासाठी मदत होईल.
  • मोबाइल हॉटस्पॉट आणि होम WI-FI नेटवर्कसाठी मजबूत पासवर्ड वापरा.
  • तुमच्या डिव्हाइसमध्ये ऑटोकनेक्ट पर्याय नेहमी बंद ठेवा.
  • तुमची ऑनलाईन फसवूणक झाली असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा घडल्यास तुम्ही @cert-in.org.in वर तुमची तक्रार नोंदवू शकता.
  • याशिवाय यूजर्स 1930 वर कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात.

थंडीत गिझरचे पाणी लवकर थंड होते? ही छोटी चूक पडू शकते महागात!

पुण्यात गावठी दारूचा धंदा उघड! दोन महिलांसह तिघांना अटक; 37 लिटर दारू जप्त

FatakPay Ugro Capital Partnership : कोणत्याही तारणाशिवाय त्वरित मिळणार कर्ज! फटाकपे आणि यूग्रो कॅपिटलची नवी भागीदारी; असा मिळवा लाभ

पुण्याचं पालकत्व फडणवीसांकडे दिलं तर वाटोळं होईल! रोहित पवारांनी सुनावलं, वाढती गुन्हेगारी गृहमंत्र्यांचं अपयश?

Kim Jong Un : संवाद संपला, आता थेट अणुयुद्धाची तयारी? उत्तर कोरियाच्या नव्या पावलाने अमेरिकेची चिंता वाढली