महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्याने भिवंडी शहरातील आसबीबी रोड येथे अजित पवार गटाचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत, कार्यकर्त्यांकडून पेढे भरवत जल्लोष करण्यात आला.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावे अशी इच्छा देखील व्यक्त करण्यात आली आहे.