कल्याण पूर्व परिसरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाईची नोटीस बजावल्यानंतर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आई एकविरा महिला मंडळाने गटई कामगारांवर कारवाई होत असताना बड्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का होत नाही, असा सवाल करत KDMC प्रशासनावर दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.
प्राजक्ता प्रधान
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कल्याण पूर्व परिसरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर कारवाईची नोटीस बजावल्यानंतर आई एकविरा महिला मंडळाने KDMC प्रशासनावर दुहेरी निकषांचा आरोप केला आहे.