Sharad Pawar यांनी साथ सोडली, ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पण Eknath Shinde यांची झोप का उडाली? 
व्हिडिओ गॅलरी

Sharad Pawar यांनी साथ सोडली, ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पण Eknath Shinde यांची झोप का उडाली?

महाराष्ट्राच्या राजकारणात बेरजेचं राजकारण आणि शरद पवार हे जणू एक समीकरणच बनलं आहे. ज्या क्षणी राजकीय विश्लेषकांना वाटतं की पवारांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, नेमक्या त्याच वेळी ते असा काही डाव टाकतात की सत्तेची आणि विरोधाची संपूर्ण गणितं बदलून जातात. पवारांच्या पुढाकारानेच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता त्याच पवारांनी नव्या राजकीय बेरजेची मांडणी करत वेगळी वाट निवडली आहे.

सुरुची कदम

महाराष्ट्राच्या राजकारणात बेरजेचं राजकारण आणि शरद पवार हे जणू एक समीकरणच बनलं आहे. ज्या क्षणी राजकीय विश्लेषकांना वाटतं की पवारांचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, नेमक्या त्याच वेळी ते असा काही डाव टाकतात की सत्तेची आणि विरोधाची संपूर्ण गणितं बदलून जातात. पवारांच्या पुढाकारानेच महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता त्याच पवारांनी नव्या राजकीय बेरजेची मांडणी करत वेगळी वाट निवडली आहे. या एकाच खेळीने एकीकडे ठाकरेंचा सर्वात मोठा आधार निसटला असून त्यांचं राजकीय गणित पूर्णपणे बिघडलं आहे. तर दुसरीकडे, सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंचीही धाकधूक का वाढली आहे? याचा हा सविस्तर आढावा...नमस्कार मी Priya Samir आणि तुम्ही पहात आहात Navarashtra..ठाकरेंचं गणित नेमकं कसं बिघडलं? २०१९ मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करण्यात शरद पवारांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याच पुढाकाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजपविरोधातील लढाईत ठाकरेंना पवारांच्या अनुभवाची भक्कम साथ मिळाली. आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय संकटात हमारे पास शरद पवार है असा विश्वास ठाकरेंचे नेते आणि कार्यकर्ते दाखवत होते. मात्र, आता चित्र पूर्णपणे बदललं आहे.

Pune News: "विरोधकांनाही पाठिंबा द्यावाच लागेल!", सचिन अहीर यांची रोखठोक भूमिका

FDA Raid Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई! १२ हॉटेल, कॅन्टीन आणि स्टोअरचे परवाने निलंबित

Kartik Amavasya 2026: कधी आहे कार्तिक अमावस्या; जाणून घ्या तिथी, धार्मिक महत्त्व आणि पूजाविधी

Goa Maze App Launched: गोवा फिरणं होणार सुपर इझी! 'या' अॅप'मुळे बसपासून रिक्षापर्यंत सर्व सेवा एका क्लिकवर

Pension Life Certificate : ...तर तुमची पेन्शन बंद होईल! 30 नोव्हेंबरची डेडलाईन चुकवू नका; लगेच सबमिट करा 'हे' कागदपत्र