युक्रेन आणि रशियाचं युध्द सुरु झालं तसं एक नावं फार चर्चेत आलं होत. हे नाव म्हणजे युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर जेलेन्सकी (Ukrainian President Volodymyr Zelensky) एक कॉमेडियन ते पंतप्रधान पदापर्यंतचा जेलेन्सकी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्याचप्रमाणे पंजाबमध्येही आता सिनेसृष्टीतून राजकारणात आलेल्या भगवंत मान यांची आता मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. भगवंत मान यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता येत असल्याचं सुरुवातीच्या कलावरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आपचे नेते भगवंत मान (bhagwant mann) हे पंजाबचे मुख्यमंत्री होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेच कल कायम राहिल्यास भगवंत मान हेच पंजाबचे मुख्यमंत्री असतील. भगवंत मानही राजकारणात येण्यापूर्वी जेलेन्स्की यांच्याप्रमाणे सिनेसृष्टीत होते. तेही फिल्मी दुनियेत कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जसा जेलेन्स्की यांचा कॉमेडियन ते पंतप्रधान असा प्रवास घडला, तसाच कॉमेडियन ते मुख्यमंत्री असा मान यांचा प्रवास होणार असल्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोण आहेत
पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील सतोज हे भगवंत मान यांचं जन्म गाव. जुगनू हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांनी संगरुरच्या एसयूएस महाविद्यालयातील बीकॉम केलं. मात्र, त्यांना नोकरी किंवा उद्योग व्यवसाय करायचा नव्हता. त्यांनतर त्यांनी सुरुवातीला कॉमेडी शो सुरू केले. कॉमेडी शोमधून जोक्स ऐकवून लोकांना मनमुराद हसवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
पंजाब पिपल्स पार्टीतून त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. 2012मध्ये त्यांनी लहरा येथून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 2014मध्ये आपने त्यांना संगरुर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं. यावेळी मात्र ते 2 लाख मतांनी विजयी झाले.
2017मध्ये त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात निवडणूक लढवली. जलालाबादमधून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या मान यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2019मध्ये त्यांनी संगरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला होता.
2017मध्ये त्यांना आपने पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. 2018मध्ये ड्रग्सचे आरोप आणि मानहानीच्या प्रकरणात आपच्या नेत्यांनी बिक्रम सिंग मजिठीया यांची माफी मागितली. त्यानंतर मान यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण केजरीवाल यांनी समजावल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.