पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जानेवारी माहिन्यातील पंजाब दौऱ्याने पंजाबमधील निवडणुकीच्या प्रचाराला कलाटणी मिळाली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये त्यावेळी वादाची ठिणगी पडली. मात्र केंद्र आणि राज्य या वादात पंजाबमधील मतदाराने काँग्रेस आणि भाजपाला नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला मतदारांनी संधी दिली आहे(Congress-BJP clash between Center and state government in panjab).
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींमुळे पंजाबमधील काँग्रेस सरकारवर देशभरातून टीका झाली होती. या घटनेनंतर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये प्रचंड वादावादी दिसून आली. पंजाबमधील विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 जानेवारी 2022 रोजी पंजाब दौऱ्यावर गेले होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने फिरोजपूर जिल्ह्यात एका उड्डाणपुलावर पंतप्रधानांचा ताफा 15 ते 20 मिनिटे खोळंबला होता. तिथून दौरा अर्धवट टाकून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला माघारी परतले.
मात्र भटिंडा विमानतळ गाठल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब सरकारवर सडकून टीका केली होती. त्यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘आपण जिवंत परतलो त्याबद्दल धन्यवाद, असा निरोप मुख्यमंत्र्यांना द्या’, अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर भाजपाने पंजाब सरकारला लक्ष्य केले. पंजाब सरकारचा हेतू शुद्ध नाही, असे सांगून मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
पंजाब सरकार आणि केंद्र सरकारमधील संबध या घटनेने प्रचंड ताणले गेले. ज्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना निवडणुकीत बसला. पंजाबमधील मतदारांनी सत्ताधारी काँग्रेसला नाकारले तसेच भाजपाला देखील या ठिकाणी फार काही हाती लागले नाही असे प्राथमिक चित्र दिसून येत आहे.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]