अमृतसर : वर्षभरापासून शेतकरी दोलोनामुळे चर्चेत असलेल्या पंजाबने निवडणुकीची चौकट पार केली आहे आणि नवा पायंडा निश्चित केला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारुन पंजाबी नागरिकांनी आपला कौल हा आम आदमी पार्टीला दिला आहे. आपच्या भगवंत मान या नव्या शिलेदाराकडे आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे येणार आहेत. औपचारिक घोषणा आता केवळ शिल्लक आहे.
पंजाबमध्ये दिग्गज पिछाडीवर गेले आहेत. यात मुख्यमंत्री चणरजीत चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आमि सुखबीर सिंह बादल यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पटियाला मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. चरणजीत सिंग चन्नी भदौड आणि चमकौर या दोन्ही मतदारसंघात पिछाडीवर आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू हे अमृतसर पूर्व मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आत्तापर्यंत पंजाबच्या मंत्रिमंडळातील १७ मंत्री पिछाडीवर आहेत.