पंजाब निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election 2022) काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने निवडणूक प्रचारासाठी ३० जणांची ‘स्टार प्रचारक’ (star campaigners list) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंजाबमधील (Punjab) आनंदपूर साहीब या लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि काँग्रेसच्या कोर ग्रुपमधील नेते म्हणून ओळख असेलल्या मनिष तिवारी (Manish Tewari) यांना वगळण्यात आलेले आहे. या यादीत सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, राहुल गांधी, सचिन पायलट यांची नावे आहेत.
याआधीच पंजाबमधील निवडणूक निर्णय प्रक्रियेतून मनिष तिवारी यांना अप्रत्यक्षपणे दूर ठेवण्यात आले होते. त्यात आता निवडणूक प्रचारातील मुख्य प्रचारकांच्या यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे, त्यामुळे पंजाब निवडणुकीत तिवारी यांना त्यांच्या लोकसभा मतदार संघापूरते मर्यादीत ठेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
[read_also content=”लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक, राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन घेतली भेट https://www.navarashtra.com/latest-news/bollywood/lata-mangeshkars-health-update-again-shifted-on-ventilator-nrps-232987.html”]
काही महिन्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत आणि संघटनेच्या कामकाजाबद्द्लच्या काही प्रश्नांसंबंधी काँग्रेसमधील एका गटाने सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ नावाने ओळखले जात आहे. या गटावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी उघडपणे टीकाही केली होती. या गटामध्ये मनिष तिवारी सहभागी होते. त्यामुळे त्यांना निवडणूक प्रचारापासून लांब ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. मात्र आपले नाव प्रचारकांच्या यादीत नाही याबद्दल मला आश्चर्य वाटत नसल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
I would have been surprised if it would have been the other way around . The reasons have been a Public Affair now for quite a while @ABHIJIT_LS Da. https://t.co/PVCXCweR83
— Manish Tewari (@ManishTewari) February 5, 2022
मनिष तिवारी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि सध्याचे तृणमुल काँग्रेसचे सदस्य असलेल्या माजी खासदार अभिजीत मुखर्जी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रियेच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “प्रचारकांच्या यादीत माझं नाव असतं तर मला आश्चर्य वाटलं असतं. कारण सगळ्यांनाच माहिती आहे.”