फोटो सौजन्य: iStock
भारतातील ऑटो इंडस्ट्री, येथील अनुकूल वातावरण आणि ग्राहकांची वाढती डिमांड. यामुळे भारतीय ऑटोमोबाईल मार्केट नेहमीच विदेशातील ऑटो कंपन्यांना खुणावत असते. तसेच इथे व्यापाराच्या संधी जास्त असल्यामुळे अनेक विदेशी ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात, ज्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करेल. यातीलच एक आघाडीची कंपनी म्हणजे निसान. नुकतेच कंपनीच्या एका कारणे 2 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे.
भारतीय मार्केटमध्ये निसान इंडियासाठी Magnite ही सर्वात लोकप्रिय लांब इंजिन असलेली कार आहे. 2020 मध्ये लाँच झाल्यापासून कंपनीने मॅग्नाइट एसयूव्हीच्या 2 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत. मॅग्नाइट हे जपानी ऑटोमेकरसाठी एक अतिशय महत्त्वाचे मॉडेल आहे.
TATA दाखवून देणार त्याची ताकद ! वर्षाअखेरीस लाँच करणार ‘या’ 5 नवीन SUV
ऑक्टोबर 2024 मध्ये निसान मॅग्नाइटला नवीन रूप देण्यात आले होते. सध्या, सब फोर मीटर एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख रुपये आहे. अलीकडेच, मॅग्नाइट सीएनजी लाँच करून, कंपनीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कारला आता रेट्रोफिटेड सीएनजी पर्याय मिळतो जो स्टॅंडर्ड किमतीपेक्षा 75000 रुपये जास्त आहे.
यात वायरलेस चार्जर, अराउंड व्ह्यू मॉनिटर, नवीन आय की, वॉक अवे लॉक, 60 मीटरमध्ये रिमोट इंजिन स्टार्ट अशी प्रगत फीचर्स आहेत. स्वच्छ हवेसाठी कंपनीने त्यात अॅडव्हान्स एअर फिल्टर बसवले आहे. ऑटो डिम फ्रेमलेस IRVM (Inside Rear-View Mirror) या कारला अधिक खास बनवते. सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 एअरबॅग्जसह अनेक सेफ्टी फीचर्स आहेत.
TVS Jupiter 125 ड्युअल टन पेंट स्कीममध्ये लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
यात 1.0-लिटर एनए पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. त्याचे पहिले इंजिन 71bhp पॉवर आणि 96Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही 5-स्पीड MT किंवा 5-स्पीड AMT सह असू शकते. हे इंजिन 6-स्पीड MT किंवा CVT सह उपलब्ध आहे.
कंपनीचा दावा आहे की ही कार सर्वोत्तम दर्जाच्या आरामदायी कारसह येते. यात 360 डिग्री लेदर टच आहे. कंपनीचा दावा आहे की ही या सेगमेंटमधील पहिली कार आहे. यात हीट इन्सुलेशन कोटिंगसह सीट्स आहेत. 4 अँबियंट लाइटिंग आहेत. यात 540 लिटरची मोठी बूट स्पेस आहे.