Tesla च्या कारला महिंद्रा कशी देणार धोबीपछाड? Anand Mahindra यांनी सांगितला मास्टर प्लॅन
भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांना भेटले. या भेटीनंतर आता टेस्ला भारतात जॉब ऑफर करणार आहे. तसेच कंपनी लवकर भारतीय मार्केटमध्ये दाखल होईल असे देखील बोलले जात आहे. यामुळे भारतीय ऑटो कंपन्यांना चांगली टक्कर मिळणार हे मात्र नक्की. अशातच आनंद महिंद्रा यांची महिंद्रा कंपनी टेस्लाला कशी टक्कर देणार याबाबत X वर आपले मत मांडले आहे.
टेस्लाने या वर्षी भारतात नोकऱ्या निर्माण करण्याबद्दल बोलले आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर, जेव्हा एका युजरने महिंद्रा ग्रुपच्या अध्यक्षांना टेस्लाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांची रणनीती काय असेल असे विचारले तेव्हा आनंद महिंद्रा यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने याचे उत्तर दिले. आनंद महिंद्रा यांनी X वर काय म्हटले त्याबद्दल जाणून घेऊया.
Tesla भारतात आपला जलवा दाखवणार; एप्रिल महिन्यात लाँच करू शकते पहिली EV
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले की, 1991 पासून असे प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही तेव्हाही संघर्ष करत होतो आणि आजही करत आहोत. आनंद महिंद्रा पुढे म्हणाले की, आमची संपूर्ण टीम पुढील 100 वर्षे रेलेव्हन्ट राहण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
ऑटोमोबाईल क्षेत्रातही, ह्युंदाई, फोर्ड आणि जनरल मोटर्स सारख्या अनेक परदेशी ब्रँडने त्यांच्या कार लाँच करण्यास सुरुवात केली, परंतु महिंद्रा अजूनही स्पर्धेत आहे आणि आपल्या नाविन्यपूर्ण आणि स्वदेशी ज्ञानाने बाजारात टिकून राहिला आहे. आता २०२५ मध्ये जेव्हा टेस्ला सारख्या दिग्गज कंपन्या भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. महिंद्रा पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने स्पर्धा करण्यास सज्ज आहे.
अलीकडेच, महिंद्राने भारतीय बाजारात त्यांचे BE6 आणि XEV 9e लाँच केले. महिंद्रा XEV 9E ही एक मोठी इलेक्ट्रिक कार आहे आणि BE 6e ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे. या कारमध्ये 59 किलोवॅट प्रति तास आणि 79 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. या वाहनांच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, BE 6e एका चार्जिंगमध्ये 682 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.
मोठी इलेक्ट्रिक कार XEV 9E एका चार्जवर 656 किलोमीटर अंतर कापण्याचा दावा करते. महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जलद चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच, OTA अपडेट्स, सेल्फी कॅमेरा, ADAS लेव्हल २, १६-स्पीकर साउंड सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले सारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे.