फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार खरेदी करणे यापेक्षा दुसरा मोठा आनंद तो काय ! म्हणूनच तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. पण कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. जर तुम्ही तुमच्या कारची योग्य काळजी घेत नसाल तर मग याचा परिणाम त्याच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो.
जर तुम्ही तुमच्या कारची योग्य काळजी घेतली नाही, तर मग एक वर्ष जुन्या असणाऱ्या कारमध्ये 10 वर्ष जुन्या कार्स इतकेच प्रॉब्लेम्स दिसू लागतात. जर तुम्हाला तुमची कार वर्षानुवर्षे सुरळीत चालवायची असेल तर मग तुम्हाला काही आवश्यक मेन्टेन्सनच्या सवयी माहित असल्या पाहिजेत. चला अशाच ५ कार टिप्सबद्दल जाणून घेऊयात.
कोणत्याही कारचे इंजिन ऑइल हे तिच्यासाठी खूप महत्वाचे असते. हे ऑइल इंजिनच्या पार्ट्सना घर्षणापासून वाचवते. तसेच जास्त गरम होण्यापासून रोखते, परंतु कालांतराने ते झिजते आणि त्यात घाण देखील जमा होऊ लागते. म्हणून, जेव्हा तुमची कार 8 ते 12 हजार किलोमीटर धावते तेव्हा तुम्ही इंजिन ऑइल बदलले पाहिजेत.
JSW MG Windsor Pro EV चा नवीन टिझर रिलीज, मिळाली ‘ही’ महत्वाची अपडेट
जर बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम व्यवस्थित काम करत नसेल, तर तुमची कार कधीही काम करणे थांबवू शकते. तुम्ही नेहमी बॅटरी टर्मिनल्सवरील गंज साफ करावा आणि त्यातील कनेक्शन घट्ट ठेवावे. तसेच, वेळोवेळी बॅटरी व्होल्टेजची टेस्टिंग घेणे महत्वाचे आहे. विशेषतः जेव्हा उन्हाळा किंवा हिवाळा ऋतूत.
कारमध्ये बसवलेले इंजिन एअर फिल्टर इंजिनमध्ये धूळ आणि घाण जाण्यापासून रोखण्याचे काम करते. जर ते पूर्णपणे काम करणे थांबवले तर त्याचा परिणाम फक्त कारच्या परफॉर्मन्सवर होतो असे नाही तर इंधनाचा वापर देखील वाढतो. म्हणूनच तुम्ही दर 20,000 ते 25,000 किमी अंतरानंतर एअर फिल्टर तपासले पाहिजे आणि स्वच्छ देखील केले पाहिजेत.
तुम्ही तुमच्या कारमधील ब्रेक सिस्टीम नेहमी चांगल्या स्थितीत ठेवावी. यासाठी, तुम्ही वेळोवेळी त्याचे ब्रेक पॅड आणि रोटर्स तपासले पाहिजेत. जर ब्रेक पॅड जीर्ण झाले असतील तर ते त्वरित बदला, अन्यथा रोटर्स देखील खराब होऊ शकतात. यासोबतच, तुम्ही नियमितपणे ब्रेक फ्लुइड, ब्रेक पाईप्स आणि होसेसमध्ये गळती किंवा गंज आहे का ते देखील तपासा.
आपल्याच Wagon R आणि Baleno वर भारी पडली Maruti ची ‘ही’ कार, मार्केटमध्ये पाहायला मिळतेय वेगळीच क्रेझ
तुमची कार नियमितपणे स्वच्छ केल्याने ती वर्षानुवर्षे नवीन दिसतेच पण ती अधिक सुरळीत देखील चालते. कार नियमितपणे स्वच्छ केल्याने त्यावरील धूळ, घाण आणि चिखल निघून जातो. त्याच वेळी, वॅक्सिंगमुळे कारच्या पेंटवर एक सेफ्टी लेयर तयार होतो, ज्यामुळे गंज लागण्याचा धोका देखील कमी होतो. त्याच वेळी, कार आतून स्वच्छ केल्याने तिच्या सीट्स आणि डॅशबोर्ड जास्त काळ टिकतात.