फोटो सौजन्य; iStock
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अहोरात्र झटत असतात. तसेच कार खरेदी करण्यासाठी बजेट देखील आखत असतात. दरमहा, वाहन उत्पादक त्यांच्या पोर्टफोलिओमधील कारवर मोठ्या प्रमाणात डिसकॉउंटस देत असतात.
जर तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कोणत्या कार आणि एसयूव्ही खरेदी करून तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता, त्याबद्दल आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी ह्युंदाई भारतीय बाजारात अनेक उत्तम कार आणि एसयूव्ही विकते. कंपनी ह्युंदाई आयोनिक 5 ही प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून ऑफर करते. जर तुम्हीही या महिन्यात ही कार खरेदी केली तर यावर 4 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही ऑफर कंपनी त्यांच्या 2024 युनिट्सवर कॅश बेनिफिट्स म्हणून देत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 46.05 लाख रुपये आहे.
लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण होईल या कारमध्ये फिट, फक्त 6 लाखात येते ही 7 सीटर कार
मारुती इन्व्हिक्टो ही एमपीव्ही सेगमेंटमध्ये मारुतीची सर्वात महागडी कार म्हणून आणली गेली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत 2024 चे उर्वरित युनिट्स खरेदी करून तुम्हाला 2.45 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी दिली जात आहे. ही ऑफर त्याच्या टॉप व्हेरियंट Alpha वर उपलब्ध असेल. त्याची एक्स-शोरूम किंमत 25.51 लाख रुपयांपासून सुरू होते.
जर तुम्ही फेब्रुवारी 2025 च्या उर्वरित दिवसांत मारुती ग्रँड विटारा खरेदी केली तर तुम्ही 2.8 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. ही बचत 2024 च्या ऑल-व्हील ड्राइव्ह एसयूव्ही युनिट्सवर करता येते. कंपनी ही एसयूव्ही कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, रूरल ऑफर्स अंतर्गत देत आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 11.09 लाख रुपयांपासून सुरू होते.
रॉयल एन्फिल्डची झोप उडवायला आली ‘ही’ बाईक, फक्त 500 ग्राहकांना मिळेल खास सवलत
जर तुम्ही फेब्रुवारी 2025 मध्ये मारुती जिमनीचा टॉप व्हेरियंट अल्फा खरेदी करणार असाल, तर या महिन्यात त्याच्या 2024 युनिट्सवर 1.91 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. ही ऑफर कंपनी बुकिंग ऑफर अंतर्गत देत आहे आणि गेल्या वर्षीच्या उर्वरित युनिट्सवर कॅश डिस्कॉउंट्स देखील देत आहे. तर, या महिन्यात त्याच्या Zeta व्हेरियंटवर 1.20 लाख रुपये वाचवता येतील. त्याची एक्स-शोरूम किंमत 12.76 लाख रुपयांपासून सुरू होते.