फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. त्यातीलच एक विश्वासाची कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीने देशात ग्राहकांची मागणी आणि आवश्यकता समजून उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच योग्य बजेटमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या कार ऑफर करत असते. म्हणूनच तर ग्राहक देखील मारुतीच्या कार खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देत असतात. जर तुम्ही सुद्धा बेस्ट मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्ही बजेट फ्रेंडली मारुती कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आपण चांगले मायलेज देणाऱ्या 3 कारबद्दल जाणून घेणार आहोत. अशा परिस्थितीत, कोणती कार खरेदी करणे तुमच्यासाठी योग्य असेल हे तुम्ही स्वतः ठरवू शकाल.
उन्हाळयात ‘या’ 5 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या, अन्यथा बाईक अचानकच देईल धोका !
जर भारतीय बाजारात कोणतीही कार स्वस्त मानली जात असेल तर ती मारुती अल्टो K10 आहे. 6 एअरबॅग्ज असलेल्या अपडेटेड मारुती अल्टोची किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरू होते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, अल्टो K10 चा पेट्रोल व्हेरियंट 24.39 ते 24.90 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतो आणि सीएनजी व्हेरियंट 33.40 ते 33.85 किलोमीटर प्रति किलोग्रॅम मायलेज देतो.
कंपनीने मारुती सुझुकी अल्टो के10 मध्ये 1.0 लिटर 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीची मॅक्सिमम पॉवर आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच, ते 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. या कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
कंपनीने मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये 998 सीसी इंजिन दिले आहे. हे इंजिन 55.92 बीएचपीची कमाल शक्ती आणि 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, या कारमध्ये मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे.
कंपनीच्या मते, ही कार तुम्हाला सुमारे 23 किमी मायलेज देते. तसेच, या कारचा सीएनजी व्हेरियंट देखील बाजारात उपलब्ध आहे. मारुती सुझुकी वॅगनआरमधील ही कार थेट हुंडई ग्रँड आय10 निओस, टाटा टियागो आणि रेनॉल्ट क्विड सारख्या कारशी स्पर्धा करते.
Automatic SUV खरेदी करण्याच्या विचारात आहात? ‘या’ 5 कारबद्दल जाणून घ्याच, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
या कॉम्पॅक्ट हॅचबॅक कारमध्ये 1-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड एएमटी ट्रान्समिशन आहे. त्याच्या सीएनजी व्हर्जनमध्ये, हे इंजिन फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि 56.7 पीएस पॉवर आणि 82 एनएम टॉर्क जनरेट करते. ज्यामध्ये 60 लिटरची सीएनजी टँक उपलब्ध आहे.
मारुती सेलेरियोचा पेट्रोल व्हेरियंट प्रति लिटर सुमारे 26 किमी मायलेज देतो तर सीएनजी व्हेरियंट प्रति किलोग्रॅम सुमारे 34 किमी मायलेज देतो. यात अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7 -इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एसी व्हेंट आणि म्युझिक कंट्रोल सारखी फीचर्स आहेत.