फोटो सौजन्य: iStock
भारतात दिवसेंदिवस कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे आता रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या वाहतूक कोंडीत कार चालवणे देखील कठीण होऊ बसते. त्यात कार जर मॅन्युअल असली तर मग अजूनच डोक्याला ताप. ट्रॅफिकमध्ये मॅन्युअल कार चालवताना आपल्याला सतत गिअर बदलावा लागतो म्हणूनच तर अनेक जण ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देत असतात.
जर तुम्ही सुद्धा ऑटोमॅटिक एसयूव्ही खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा ऑटोमॅटिक एसयूव्हींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत ही 10 लाखांपेक्षा कमी असणार आहे.
खिडक्या उघड्या ठेवून कार चालवल्यास मायलेजमध्ये होतेय घट? जाणून घ्या सत्य
भारतातील आघाडीच्या कार उत्पादकांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकीने फ्रॉन्क्स ही चार मीटरपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही म्हणून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी ही एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह विक्रीसाठी उपलब्ध करून देते. त्याचा AGS व्हेरियंट डेल्टा आणि डेल्टा प्लसमध्ये उपलब्ध आहे. या कारची किंमत 8.88 लाख रुपये आणि एक्स-शोरूम 9.43 लाख रुपये आहे.
ह्युंदाई त्यांची चार मीटरपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही एक्सटीरियर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या ऑप्शनसह देखील उपलब्ध करून देते. कंपनीच्या या एसयूव्हीच्या सहा व्हेरियंटमध्ये एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे. S+ ही एसयूव्हीचा बेस एएमटी व्हेरियंट म्हणून देण्यात आली आहे. या कारचे एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. त्याचा टॉप एएमटी व्हेरियंट 10.51 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
रेनॉल्ट कंपनी किगर ही एसयूव्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह उपलब्ध करून देते. हा पर्याय सहा व्हेरियंटमध्ये देखील दिला गेला आहे. ही एसयूव्ही RXL Easy R-AMT मध्ये बेस व्हेरियंट म्हणून AMT सह देण्यात आली आहे. रेनॉल्ट किगर ऑटोमॅटिकची किंमत 7.34 लाख ते 11.23 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.
उन्हाळयात ‘या’ 5 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या, अन्यथा बाईक अचानकच देईल धोका !
टाटा पंच एसयूव्हीच्या अॅडव्हेंचर व्हेरियंटमध्ये देखील एएमटी ट्रान्समिशन दिले गेले आहे. ही एसयूव्ही ग्राहकांकडून सर्वाधिक पसंत केली जाते. याचा एएमटी व्हेरियंट 7.77 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल. एएमटी ट्रान्समिशन असलेल्या त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.72 लाख रुपये आहे.
निसान कंपनी भारतात आपली मॅग्नाइट एसयूव्ही 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑफर करते. या एसयूव्हीमध्ये एएमटी व्हेरियंट देखील देण्यात आला आहे. निसान मॅग्नाइटचा एएमटी व्हेरियंट 6.60 लाख ते 8.74 लाख रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येऊ शकते. या एसयूव्हीमध्ये, कंपनी एकूण पाच व्हेरियंटमध्ये एएमटी ट्रान्समिशन उपलब्ध करून देते.